औरंगाबादच्या खाम नदी संजीवनीचा पॅटर्न राज्यभर राबवण्यासारखा! पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंकडून कौतुक
यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुभाष ऑक्सिजन हब येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आदित्य सरोवर, उन्नती सरोवर, डॉक्टर रफिक झाकरिया खाम नदी प्रकाशयोजना नूतनीकरण पथदिव्यांचे, चंद्रकांत खैरे योग लाॅन, अंबादास दानवे फुलपाखरू उद्यान, व्हेराॅक एफीथिएटर व हॉलीबॉल खेळून हॉलीबॉल ग्राऊंडचे उद्घाटन केले.
औरंगाबादः शहरातील खाम नदीचे बदललेले सौंदर्य आणि निसर्गरम्य परिसर बघून ही नदी कधी काळी निर्जीव झाली होती, यावर विश्वासही बसत नाही. आज खऱ्या अर्थाने शहराचा शाश्वत विकास झाल्याचे येथे पाहायला मिळाले. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना अभिमान वाटला असता, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली. प्रजासत्ताक दिनानमित्त त्यांनी औरंगाबादमधील खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला भेट दिली. शासनाचा एक पैसाही खर्च न करता खा Aditya Thackeray म नदीचे पुनरुज्जीवन करून गतवैभव मिळवून दिल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय (Astik kumar Pande) व इको सत्व,व्हॅरॅक, छावणी परिषद आदींचे कौतुक केले. तसेच खाम नदीचा पॅटर्न महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकेत राबवण्यात यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
खाम नदी इको पार्कचे लोकर्पाण
खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत खाम इको पार्कचे लोकार्पण आज बुधवारी 26 जानेवारी 2022 रोजी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, खामनदीचा विकसित केलेला परिसर बघून आपणास आनंद झाला आहे. अशी जागा निर्माण झाली की, पुनर्जीवित झाली असे कोणी विचारही केला नसेल खऱ्या अर्थाने शहराचा शाश्वत विकास झाल्याचे पाहायला मिळाले. इतर शहराचे 51 टक्के शहरीकरण झाले आहे. शहराकडे लक्ष देणारे नव्हते परंतु आम्ही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेगळ्या विषयावर शहराचे विकासाच्या संदर्भात लक्ष दिले आहे. खाम नदीचा परिसर बघून आनंद झाल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. नदीचे खोलीकरण, रुंदीकरण , पिचींगकरून दोन्ही काठावर वृक्षारोपण करण्यात आले आहे.
नदी प्रकल्पाचे दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु- प्रशासक
आस्तिक कुमार पाण्डेय यांनी खाम नदी पुनरुज्जीवन विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या वर्षभरात महानगरपालिका, स्मार्ट सिटी, इको सत्व, व्हॅरॅक छावणी परिषद यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून खाम नदीचा चेहरामोहरा बदलू कायापालट केला आहे. नदीच्या विकास कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात काम सुरू झाले आहे. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यासाठी डिपीआर केला जात आहे. भविष्यात वैभव दाखवणारी नवीन खाम नदी शहरवासीयांना बघायला मिळणार आहे.
अनेक विकास कामांचे उद्घाटन
पर्यटक व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे खाम नदीवर आगमन झाल्यानंतर त्यांनी विकासित करण्यात आलेला खाम नदी परिसराची पाहणी केली. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी विविध विकास कामाची माहिती दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुभाष ऑक्सिजन हब येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आदित्य सरोवर, उन्नती सरोवर, डॉक्टर रफिक झाकरिया खाम नदी प्रकाशयोजना नूतनीकरण पथदिव्यांचे, चंद्रकांत खैरे योग लाॅन, अंबादास दानवे फुलपाखरू उद्यान, व्हेराॅक एफीथिएटर व हॉलीबॉल खेळून हॉलीबॉल ग्राऊंडचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी खासदार चंद्रकांत,खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ,महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
इतर बातम्या-