Aurangabad | अश्लील व्हिडिओ करणारा कीर्तनकार पोलिसांच्या जाळ्यात, औरंगाबादेत महिलेसोबतचा व्हिडिओ होता चर्चेत!

या अश्लील व्हिडिओ प्रकरणी शिल्लेगाव पोलीस स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडिओतील महाराज आणि महिलेवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. तशी रितसर तक्रार त्यांनी 10 एप्रिल रोजी दाखल केली होती.

Aurangabad | अश्लील व्हिडिओ करणारा कीर्तनकार पोलिसांच्या जाळ्यात, औरंगाबादेत महिलेसोबतचा व्हिडिओ होता चर्चेत!
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 3:50 PM

औरंगाबादः गंगापूर तालुक्यातील अश्लील व्हिडिओतील कीर्तनकार (Kirtankar Maharaj) बाबाला बेड्या ठोकण्यात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना (Aurangabad rural police) अखेर यश आलं आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गंगापूरमधील या कीर्तनकार बाबाचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यामुळे मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनांकडून कीर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर या महाराजाला गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली आहे. बाळकृष्ण मोगल असे या अटक केलेल्या महाराजाचे नाव असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियात देण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीनुसार, हा व्हिडिओ मोगल यानेच चित्रीत केला असून तो या महिन्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर लीक झाला होता. मात्र कीर्तनकार महाराजांच्या अशा व्हिडिओमुळे संपूर्ण औरंगाबादमध्ये खळबळ माजली होती.

धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तक्रार

कीर्तनकार बाबाचा अशा प्रकारे एका शिष्य महिलेसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असल्याची तक्रार छत्रपती शिवाजी महाराज सेनेतर्फे करण्यात आली होती. 08 एप्रिल रोजी त्यांनी सदर कीर्तनकार बाबा आणि व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र सदर प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे कीर्तनकार बाबाला अटक करण्यासाठी पोलिसांना वेळ लागला. अखेर मंगळवारी या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

कोर्टात हजर, जामीन मंजूर

या अश्लील व्हिडिओ प्रकरणी शिल्लेगाव पोलीस स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडिओतील महाराज आणि महिलेवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. तशी रितसर तक्रार त्यांनी 10 एप्रिल रोजी दाखल केली होती. त्यानंतर व्हिडिओतील दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून गंगापूर येथील कोर्टात त्याला हजर केले असता न्यायालयाने महाराजाला जामीन मंजूर केल्याचीही प्राथमिक माहिती हाती आली आहे. औरंगाबादमध्ये प्रसिद्ध असलेल्या या महाराजाचा असा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

इतर बातम्या-

Health | आंबलेल्या पदार्थांशी संबंधित हे आरोग्य फायदे जाणून घ्या, वाचा महत्वाचे!

CNG rates hike : पुणेकरांना पंधरा दिवसांत दुसरा धक्का, सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या नवे दर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.