Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Weather : औरंगाबादेत पावसाचा जोर ओसरला, ऊन-सावलीचा खेळ, 6 सप्टेंबरनंतर दणक्यात बरसणार

6 सप्टेंबरनंतर तीन-चार दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. औरंगाबाद शहरात एमजीएम जेएनईसी (MGM JNEC) भागात 26.2 मिमी तर गांधेली (Gandheli, Aurangabad) भागात 21.3 मिमी पावसाची नोंद

Aurangabad Weather : औरंगाबादेत पावसाचा जोर ओसरला, ऊन-सावलीचा खेळ, 6 सप्टेंबरनंतर दणक्यात बरसणार
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 12:32 PM

औरंगाबाद: औरंगाबाद आणि मराठवाडा (Rain in Marathwada Region) भागात पावसाचा जोर ओसरला असून आज बहुतांश भागात सूर्याचे दर्शन घडले. तसेच काही भागात ऊन-सावलीचा खेळ रंगलेला दिसून येत आहे. आता 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण कमी होणार असून आकाश स्वच्छ राहिल. मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. मात्र पुन्हा 6 सप्टेंबरनंतर तीन-चार दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात  मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद शहरात एमजीएम जेएनईसी (MGM JNEC) भागात 26.2 मिमी तर गांधेली (Gandheli, Aurangabad) भागात 21.3 मिमी पावसाची नोंद झाली. तर1 सप्टेंबर रोजी एमजीएम जेएनईसी भागात 6.1 मिमी तर गांधेली भागात 23.4 मिमी पावसाची नोंद झाली.

कन्नड तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान

औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील महसूल मंडळांपैकी 7 मंडळांत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिले आहेत. कन्नड तालुक्यातील भिलदरी तलाव फुटल्याने भोवतालच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांची व्यथा जाणून घेतली. तसेच गावनिहाय पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी नागद, सायगव्हाण या भागातील पिकांचीही यावेळी पाहणी केली.

सप्टेंबर महिन्यातही हलक्या स्वरुपाचा पाऊस

जूनमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. यंदा मान्सून सरासरीच्या 101% एवढ्या प्रमाणात होईल, असा अंदाज जूनमध्ये मान्सूनच्या आगमनापूर्वी भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला होता. बुधवारी मात्र खात्याने या अंदाजात सुधारणा केली. यंदाचा मान्सून सरासरीइतरकाच पडेल, असे म्हटले गेले. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा 24.1% पर्यंत पाऊस पडला.

जिल्ह्यात यंदा सरासरीइतकाच पाऊस

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 5% जास्त, मराठवाड्यात 20% जास्त तर विदर्भात 14% कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात औरंगाबादसह, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत सरासरीइतका पाऊस पडला. तर परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. जून ते ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात 528.2 मिमी पावसाची नोंद झाली. जालन्यात 667.4 मिमी, बीडमध्ये 573.1मिमी, लातूरमध्ये 557.6 मिमी, उस्मानाबादमध्ये 494.7मिमी, नांदेडमध्ये 792.4 मिमी, परभणी 718.5मिमी , हिंगोलीत 711.1मिमी , तसेच एकूण औरंगाबाद विभागात 639.1 मिमी पावसाची नोंद झाली. (Aurangabad, Maharashtra, The metrological department has forecasted light rain in some region today)

इतर बातम्या:

Pune Weather | पुण्यावर आज ढगांचं अच्छादन कायम, दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता

Weather Update : पालघरला रेड ॲलर्ट, मुंबईसह कोकण ते उत्तर महाराष्ट्रात मुसळधार, IMD कडून नवा अंदाज जारी

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.