लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी बाजारात गर्दी, औरंगाबादेत बालगणेशाच्या मोहक मूर्तींची भूरळ

यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घरोघरी लहान मुलांनी शाडूच्या मातीचे गणपती तयार केले आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्ते, संस्थांच्या माध्यमांतून कार्यशाळा घेण्यात आल्या.

लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी बाजारात गर्दी, औरंगाबादेत बालगणेशाच्या मोहक मूर्तींची भूरळ
सातारा परिसरात ईश्वरी आणि आशय देवगिरीकर या भावंडांनी साकारलेला शाडूच्या मातीचा गणपती बाप्पा.
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 10:48 AM

औरंगाबाद: यावर्षी गणपती बाप्पाची कृपा झाली आणि कोरोनाचं दाट ढग काहीसं दूर झालंय. पावसानं काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात रौद्र रुप दाखवलं तरीही गणेशोत्सवासाठी (Ganesh Festival, Aurangabad) जणू वरुणराजानंही आपला रोष आवरता घेतल्याचं चित्र आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातही लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु झाली आहे. सकाळपासूनच भाविकांनी बाजारपेठेत गणपतींच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. शहरातील गुलमंडी, जिल्हा परिषद मैदान, सिडको-हडको, गजानन महाराज मंदिरसह शिवाजीनगर भागात गणेश मूर्तींची दुकाने थाटण्यात आली आहे.

गजानन मंदिर परिसर फुलला

शहरात गुलमंडी आणि गजानन मंदिराजवळ गणपतीच्या मूर्तींची सर्वाधिक दुकाने लागलेली असतात. यावर्षीही या परिसरात गणेशाच्या मूर्ती, मखर, सजावटीचे साहित्य, फुलं, दुर्वा आदींची दुकाने थाटण्यात आली आहे. या रस्त्यावर साधारण 50 ते 60 दुकाने थाटण्यात आली आहेत. तर जिल्हा परिषद मैदानावरही 15 ते 20 दुकाने लावलेली आहेत. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला होता, त्यामुळे दुकानांची संख्याही कमी होती. यंदा मात्र कोरोनाचे मळभ काहीसे दूर झाले असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

कोरोनामुळे मूर्तींची आधीच बुकिंग

शहरातील काही मूर्तीकारांनी आणि दुकानांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही दिवसांपासून फोनवर गणपतीच्या मूर्तींची बुकिंग सुरु केली होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी गर्दीत आवडती मूर्ती शोधण्याची समस्याही दूर झाली.

बालगणेशाच्या मूर्तींची मोहक रुपे

यंदा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने वाहतुकीचा खर्चही वाढला हआहे. त्यामुळे गणपतीच्या मूर्ती पंचवीस टक्क्यांनी महाग झाल्याचे चित्र आहे. मात्र बाजारात गणेशभक्तांचा उत्साह पहायला मिळत आहे. बालगणेशाची शांत विचाराधीन मूर्ती, आराम करताना गणपती बाप्पा, मोदक खाणारा किंवा वामकुक्षी घेणाऱ्या गणेशाच्या मूर्ती भाविकांना विशेष भुरळ घालत आहेत. तसेच लहान मुलांना आवडणारे मोटू-पतलू कार्टूनचे गणराय आणि बैलदाडीवरचे गणरायही भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

दुपारी दीड वाजेपर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त

गणपतीची मूर्ती घरी बसवण्यासाठी पंचांगानुसार नियोजित वेळ दिलेली आहे. त्यानुसार, पहाचे 6.15 वाजेपासून ते दुपारी 1.30 मिनिटांपर्यंत चांगला मुहूर्त आहे. त्यानुसार शहरातील विविध भागातील नागरिकांनी शुभ मुहूर्तावर वैयक्तिक किंवा सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली आहे.

घरा-घरात मुलांनी साकारले शाडूच्या मातीचे गणेश

यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घरोघरी लहान मुलांनी शाडूच्या मातीचे गणपती तयार केले आहेत. हे गणपती तयार करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते, संस्थांच्या माध्यमांतून गणपती तयार करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. तसेच शाडूच्या मातीचीच मूर्ती तयार करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात आली. (Aurangabad market blooms on the occasion of ganesh chaturthi)

इतर बातम्या-

Ganesh Chaturthi 2021 | महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आज आगमन, भाविकांमध्ये मोठा उत्साह

Ganesh Chaturthi 2021 : चतुर्थीला चंद्र दिसल्यानंतर भगवान श्रीकृष्णांवरही लागला होता चोरीचा आरोप

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.