AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad MIM | नौटंकीने पाणी मिळणार असेल तर आम्हीही मोर्चात सहभागी होऊ, इम्तियाज जलील औरंगाबादच्या पाणीप्रश्नी शिवसेना-भाजपावर भडकले

औरंगाबाद परिसरात प्रचंड पाणी असून फक्त वितरणाची व्यवस्था नसल्यामुळे शिवसेना आणि भाजपने फक्त नामांतर आणि मंदिर-मशिदीचा मुद्दा उचलून धरल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे, असा आरोप खा. जलील यांनी केला आहे.

Aurangabad MIM | नौटंकीने पाणी मिळणार असेल तर आम्हीही मोर्चात सहभागी होऊ, इम्तियाज जलील औरंगाबादच्या पाणीप्रश्नी शिवसेना-भाजपावर भडकले
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 1:36 PM

औरंगाबादः शहराची पाणी पट्टी कमी करून आणि हंडा मोर्चासारखी नौटंकी करून औरंगाबादकरांना खरच पाणी मिळणार असेल तर मीसुद्धा मोर्चात सहभागी होईन, अशी संतप्त प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM Imtiaz Jaleel) यांनी दिली. शहरातील पाणी समस्येवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेविरोधात आज भाजपतर्फे विराट मोर्चा (BJP Morcha) काढला जात आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. शहरातील हजारो महिला रिकामे हंडे घेऊन या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दुपारी चार वाजता हा मोर्चा पैठण गेट येथून निघून पालिका आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. शिवसेनेने मागील २५-३० वर्षांपासूनच्या पाणी समस्येवर काहीही उपाय केला नाही, असा आरोप भाजपने केला आहे. तर शिवसेनेप्रमाणे भाजपदेखील सत्तेत होती, तेव्हा हा प्रश्न दिसला नाही, असा सवाल करत शिवसेना भाजपाला तोंडघाशी पाडण्याचा प्रयत्न करक आहे. त्यात आता एमआयएमनेही दोन्ही पक्षांना चांगलेच सुनावले आहे.

काय म्हणाले खा. जलील?

आज भाजप आणि फडणवीस साहेब नौटंकी करत आहेत. यामुळे जर पाणी मिळणार असेल तर मी काय औरंगाबादचे सगळेच लोक यात सहभागी होतील. पण अशी चीप पल्बिसिटी आम्हाला करायची नाही. हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मोर्चाऐवजी जलजीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद पाणी वितरण, महापालिका पाणी वितरण अधिकारींची बैठक बोलवली असती. जी नवी पाणीपुरवठा योजना पुढील दोन वर्षात होणार आहे, ती सहा महिन्यात, एका वर्षात करता येईल का, यावर चर्चा झाली असती तर काही साध्य झालं असतं.

हे सुद्धा वाचा

पाणी नाहीच ..हे रिकामा हंडा देणारेत…

भाजपच्या मोर्चावर प्रश्नचिन्ह उभं करताना एमयआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले, भाजपच्या मोर्चात सहभागी होणाऱ्या महिला पैसे देऊन आणल्या जाणार आहेत. तसेच त्यांना हंडेही घेऊन दिले जाणार असल्याचं सांगण्यात येत नाही. त्यामुळे पाणी नाही तर हंडा तरी मिळेल, या आशेने लोक मोर्चात सहभागी होत आहेत, असा आरोप खासदार जलील यांनी केला.

‘मंदिर-मशिदीच्या मुद्द्यामुळेच पाणी नाही’

औरंगाबाद परिसरात प्रचंड पाणी असून फक्त वितरणाची व्यवस्था नसल्यामुळे शिवसेना आणि भाजपने फक्त नामांतर आणि मंदिर-मशिदीचा मुद्दा उचलून धरल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे. या समस्येसाठी लोकही तितकेच जबाबदार आहेत. त्यांनी हिंदु-मुस्लिमांचा मुद्दा उचलून धरणाऱ्यांना मतं दिलं. त्यांनी जर रस्ते आणि पाण्याचा प्रश्न उचलून धरला असता तर आज ही वेळ आली नसती. पाण्यासाठी लोकांनी कधीही मतदान केलं नाही.’

‘दोन पक्षांच्या श्रेयवादात जनता उपाशी’

खा. जलील म्हणाले, ‘ आज शहरातील दहा दिवसांनी एक तास पाणी पुरवठा होतो. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी औंरंगाबादमधून उकळली जाते. आत्ता ही पाणीपट्टी निम्मी कमी केली. त्याचे मोठे होर्डिंग्सही लावले आहेत. यासाठी भाजप-शिवसेना दोघंही जबाबदार आहेत. शिवसेना म्हणजे आमचा गड आहे तर भाजप म्हणते आमचा गड आहे. या दोघांच्या भांडणात औरंगाबादच्या जनतेला गाडण्याचं काम सुरु आहे, 30 वर्षांपासून शिवसेना औरंगाबादकरांना उल्लू बनवत आहे, असा आरोप खा. जलील यांनी केला.’

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.