मुलांचा फुटबॉल विहिरीच्या दिशेने गेला अन् बेपत्ता पोलीसाचा शोध लागला,औरंगाबादेत खळबळ!

गाडे यांचा मृतदेह आढळला असला तरी त्यामागील नेमकं कारण शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. प्राथमिक अंदाजानुसार, तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र नेमका कोणत्या गोष्टीच्या तणावाखाली ते होते, याचा शोध अद्याप लागलेला नाही.

मुलांचा फुटबॉल विहिरीच्या दिशेने गेला अन् बेपत्ता पोलीसाचा शोध लागला,औरंगाबादेत खळबळ!
गाडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचं आ्व्हान पोलिसांसमोर आहे.
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 1:30 PM

औरंगाबादः शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेले संजय फकीरराव गाडे (Sanjay Gade) हे मागील आठवड्यापासून बेपत्ता होते. शहर पोलिसांतर्फे (Aurangabad police) त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र काहीच धागेदोरे हाती येत नव्हते. अखेर रविवारी अचानकपणे एका व्यक्तीचा विहिरीत आढळला. पोलिसांनी तपास केला असता मृतदेहाची ओळख पटली आणि तो पोलीस कर्मचारी संजय फकीरराव गाडे यांचाच असल्याचे उघड झाले. प्राथमिक अंदाजानुसार, गाडे यांनी तणावातून आत्महत्या (Suicide case) केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. मात्र गाडे यांचा अशा प्रकारे मृतदेह आढळल्यामुळे शहर पोलिसांत रविवारी खळबळ माजल्याचे चित्र होते.

24 जानेवारीपासून बेपत्ता

औरंगाबादमधील पोलीस मुख्यालयात पोलीस नाईक म्हणून कर्तव्यावर असलेले संजय गाडे हे पडेगाव परिसरात रहात होते. त्यांना तीन मुले आणि पत्नी असून एक मुलगा पोलिसात आहे. 24 जानेवारी रोजी संजय गाडे हे ड्युटीवर गेले. परंतु संध्याकाळपर्यंत घरी परतलेच नाहीत. त्यांच्या पत्नीने पोलिल मुलाला यासंदर्भात माहिती दिली. रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध घेतला गेला मात्र त्यांचा मोबाइलही बंद होता. अखेर बेगमपुरा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.

मुले खेळताना विहिरीजवळ बॉल गेला अन्..

रविवारी संध्याकाळी काही मुले आयुक्तालयाच्या परिसरातील विहिरीजवळ खेळत होते. तेव्हा त्यांचा फुटबॉल विहिरीच्या दिशेने गेला. मुलांनी या बाजूने दुर्गंधी येत असल्याचे प्रशिक्षक तडवी यांना सांगितले. तडवी यांनी विहिरीजवळ डोकावून पाहिले असता विहिरीत मृतदेह आढळला. गाडे यांचा मुलगा किशोर यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी येऊन पाहिले असता मृतदेहाची ओळख पटली. गाडे यांचा मृतदेह सापडल्याची माहिती समजताच परिमंडळ एकच्या उपायुक्त उज्ज्वला वनकर, मुख्यालयाच्या उपायुक्त अपर्णा गिते, गुन्हे शाखेचे सहाय्यक उपायुक्त विशाल ढुमे, छावणीचे सहाय्यक आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकारामुळे शहर पोलिसात खळबळ उडाली आहे.

मृत्यूचे गूढ कायम

दरम्यान, गाडे यांचा मृतदेह आढळला असला तरी त्यामागील नेमकं कारण शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. प्राथमिक अंदाजानुसार, तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र नेमका कोणत्या गोष्टीच्या तणावाखाली ते होते, याचा शोध अद्याप लागलेला नाही.

इतर बातम्या-

Chanakya Niti | रिस्क हैं तो इश्क हैं ! व्यवसाय सुरू करताय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी पाहाच

Chicken fly Viral Video : हवेत ‘अशी’ लांब आणि उंच उडणारी कोंबडी कधी पाहिली नसेल

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.