Aurangabad: स्वतःची गाडी व्यवस्थित पार्क केली तरी मोठे योगदान, मनपा प्रशासकांचा टोला, प्रकल्पांविषयी घेतली बैठक

मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. शहरातील विविध सेवा भावी संस्थेचे प्रतिनिधी, शाळा कॉलेजचे प्रतिनिधी, हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधी, एनसीसी , एस आर पीएफचे प्रतिनिधी उपस्थित होते

Aurangabad: स्वतःची गाडी व्यवस्थित पार्क केली तरी मोठे योगदान, मनपा प्रशासकांचा टोला, प्रकल्पांविषयी घेतली बैठक
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 7:38 PM

औरंगाबाद: शहरात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांमध्ये नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, नव-नवीन उपक्रम राबवावेत, असे आवाहन औरंगाबादचे मनपा  (Aurangabad Municipal corporation)प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी केले. आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शहरातील उपक्रमांमध्ये हातभार लावतानाच नागरिकांनी निदान आपली गाडी व्यवस्थित पार्क केली तरी मोठे योगदान ठरेल, असा टोलाही मनपा प्रशासकांनी नागरिकांना लगावला. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र (Maulana Abul Kalam Azad Research center) येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. शहरातील विविध सेवा भावी संस्थेचे प्रतिनिधी, शाळा कॉलेजचे प्रतिनिधी, हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधी, एनसीसी , एस आर पीएफचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शहराच्या सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घ्यावा, मनपा मदत करेल

‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत असताना लोकसहभाग महत्वाचा आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन यासाठी आपले योगदान दिले पाहिजे. एक नागरिक म्हणून आपण एक वर्षभर शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले पाहिजेत. आपल्या आपल्या अभिनव पद्धतीनेही हा अमृत महोत्सव साजरा करू शकतो. प्रकल्प राबविण्यास महानगरपालिका किंवा स्मार्ट सिटीची मदत लागत असेल तर यासाठी आम्ही सदैव तयार आहोत, असे आवाहन औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी केले. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित आझादी का अमृतमहोत्सवी वर्षाला सुरुवात झाली आहे. यात औरंगाबाद महानगर पालिका व स्मार्ट सिटी आपले योगदान देत आहे. अमृत महोत्सव अंतर्गत वर्षभर कार्यक्रम सुरू राहणार आहेत. यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे असे प्रतिपादन महानगरपालिका प्रशासकांनी केले.

यावेळी औरंगाबद शहरात सुरु असलेल्या आणि सक्रिय असलेल्या प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. तसेच यात आणखी भर घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याच आवाहनही केले.

शहरातील कोणत्या प्रकल्पांबाबत बोलले प्रशासक?

  • औरंगाबाद महानगरपालिकेत कचरा व्यवस्थापन बाबत मागील काही काळापासून कचरा प्रश्न निर्माण झाला होता. तो आता मार्गी लागला आहे. 200 ते 300 कचरा गाड्यांच्या माध्यमातून शहरात प्रत्येक घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात असून त्याचे वर्गीकरण व प्रक्रिया पाडेगाव, चिकलठाणा आणि कंचनवाडी या प्रक्रिया केंद्रांवर करण्यात येत आहे.
  • शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांचे कामे पूर्ण झाली असून काही काळात उर्वरित रस्त्याचे कामे पूर्ण होणार आहेत. शहराबाहेरील नागरिकांना शहरातील रस्त्यांच्या सद्य स्थिती बाबत विचारले तर ते आता नक्कीच समाधान व्यक्त करत आहेत.
  • महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या 1680 कोटीच्या शहर पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. येत्या काही वर्षात योजना पूर्ण होऊन शहरातील पाणी पुरवठा समस्या दूर होणार आहे.
  • शासनाच्या वतीने मनपा आकृतिबंध मंजूर झाला असून काही काळातच नोकर भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
  • महानगर पालिका व स्मार्ट सिटी यांच्या वतीने इ गव्हर्नन्स प्रकल्पावर काम सुरू करण्यात आले आहे. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. महानगरपालिका 21 व्या शतकाकडे वाटचाल करत असताना या प्रकल्पामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे असे ते म्हणाले.इतर बातम्या-  Aurangabad: 1 ऑक्टोबरपासून बिलावर हवा परवाना क्रमांक, खाद्यपदार्थ विकत घेताना बाळगा सावधगिरी
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.