तिसऱ्या लाटेत राज्यात दिवसाला 16 हजार रुग्णांचा अंदाज, औरंगाबाद महापालिकेची यंत्रणा सज्ज

औरंगाबाद: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता (Third Wave of Corona) ओसरली असली तरीही आता तिसरी लाट यापेक्षाही अधिक तीव्र आणि गंभीर स्वरुपाची असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीसह, राज्य स्तरावर आरोग्ययंत्रणांची () तयारी सुरु आहे. याच धर्तीवर विविध शहरांतील आरोग्ययंत्रणांच्या प्रमुखांची नुकतीच बैठक झाली. यात औरंगाबादमधील महापालिकेची (Health department in Aurangabad Municipal […]

तिसऱ्या लाटेत राज्यात दिवसाला 16 हजार रुग्णांचा अंदाज, औरंगाबाद महापालिकेची यंत्रणा सज्ज
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 10:17 AM

औरंगाबाद: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता (Third Wave of Corona) ओसरली असली तरीही आता तिसरी लाट यापेक्षाही अधिक तीव्र आणि गंभीर स्वरुपाची असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीसह, राज्य स्तरावर आरोग्ययंत्रणांची () तयारी सुरु आहे. याच धर्तीवर विविध शहरांतील आरोग्ययंत्रणांच्या प्रमुखांची नुकतीच बैठक झाली. यात औरंगाबादमधील महापालिकेची (Health department in Aurangabad Municipal corporation) आरोग्य यंत्रणाही तिसऱ्या लाटेसाठी विविध पातळीवर सज्ज असल्याची माहिती औरंगाबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा (Dr. Paras Mandlecha) यांनी दिली.

राज्यात दिवसाला 16 हजार रुग्णांची शक्यता

राज्याच्या आरोग्य विभागातर्फे शनिवारी व्हिडिओ कॉन्सफन्सिंगद्वारे विविध शहरांतील आरोग्य प्रमुखांची ठक घेण्यात आली. तिसऱ्या लाटेत एका दिवसात जास्तीत जास्त १६ हजार ८३९ रुग्ण आढळतील, असा अंदाज गृहीत धरून यंत्रणांची उभारणी करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 27 मार्च 2021रोजी सर्वाधिक 11 हजार 226 सक्रिय रुग्ण दाखल झाले होते. तिसऱ्या लाटेत एकाच दिवसात 16 हजार 839 सक्रिय रुग्ण दाखल होऊ शकतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. यातील 65 टक्के म्हणजे 10 हजार 945 रुग्ण लक्षणे नसलेले असण्याची शक्यता आहे. 35 टक्के रुग्णांना (5,893) लक्षणे असतील. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे लागेल. त्यातील निम्मे रुग्ण सरकारी दवाखान्यांमध्ये, तर निम्मे खासगी दवाखान्यांमध्ये दाखल होतील.

मनपाकडे किती बेड्स, व्हेंटीटर्स उपलब्ध?

औरंगाबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी या ऑनलाइन बैठकीत शहरातील आरोग्य यंत्रणेकडून कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, याचा अहवाल सादर केला. मनपा क्षेत्रात ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर्स आदी सुविधा पुरेशी असल्याची माहिती त्यांनी दिली. तिसरी लाट आणि संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेता 3,754 आयसोलेशन बेड्सची शक्यता आहे. मनपा क्षेत्रात 3,969 बेड उपलब्ध आहेत. 251 आयसोलेशन बेड जास्तीचे आहेत. 2002 ऑक्सिजन बेड लागतील असा अंदाज आहे. मनपा क्षेत्रात 2,988 ऑक्सिजन बेड, 997 आयसीयू बेड उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर बेड 250 लागण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात 361 व्हेंटिलेटर बेड (111 जास्त) आहेत. एका दिवसात 13 व्हेंटिलेटर्स लागतील. मनपाकडे 41 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत.

शहराच्या प्रवेशद्वारांवर अँटीजन टेस्ट

दरम्यान, औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने 20 मार्च 2021 पासून महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून अन्य जिल्ह्यातून अथवा बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहरातील प्रवेशद्वारा वरती अँटीजन चाचणी करण्यात येत आहे . यानुसार 19 सप्टेंबर रोजी शहरातील 6 प्रवेश द्वारावरती 823 जणांची कोरोना अँटीजन चाचणी करण्यात आली.यात चिकलठाणा, हर्सूल टी पॉईंटवर, कांचनवाडी, झाल्टा फाटा, नगर नाका, दौलताबाद टी पॉईंट येथे एकूण 283 जणांची अँटीजन कोरोना चाचणी करण्यात आली. इतर बातम्या- 

आमदार आशुतोष काळे यांना कोरोना, साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद स्वीकारताना झाली होती गर्दी, संसर्ग वाढणार ?

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी घट, मात्र आकडा 30 हजारांच्या वरच

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.