मोठी बातमीः मालमत्ता कर भरला नाही? औरंगाबाद महापालिका केव्हाही जप्ती घेणार! लिलाव करण्याचे अधिकारही प्राप्त!

मालमत्ता कर चुकवणे यापुढे औरंगाबादकरांना चांगलेच महागात पडणार आहे. कारण महापालिकेला आता अशा कर चुकवणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. अशा मालमत्तांची जप्ती आणि त्यांचा लिलावदेखील महापालिका करू शकते.

मोठी बातमीः मालमत्ता कर भरला नाही? औरंगाबाद महापालिका केव्हाही जप्ती घेणार! लिलाव करण्याचे अधिकारही प्राप्त!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 8:00 AM

औरंगाबादः कर थकवणाऱ्या मालमत्ता (Property tax) जप्त करण्याचा आणि त्यांचा लीलाव करण्याचा अधिकार औरंगाबाद महापालिकेला (Aurangabad municipal corporation) प्राप्त झाला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ औरंगाबाद महापालिकेलाही मालमत्ता जप्तीचा अधिकार मिळाला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, त्याअंतर्गत कर थकवणाऱ्या मालमत्तांविरोधातही कारवाई करण्याचे शस्त्र उगारण्यात येणार आहे.

70 टक्के मालमत्ता कर न भरणारे

महापालिकेकडे येणाऱ्या मालमत्ता करातील उत्पन्न पाहता, शहरातील 70 टक्के नागरिक महापालिकेचा मालमत्ता करच भरत नाहीत. कर न भरणाऱ्या नागरिकांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. आतापर्यंत अशा मालमत्ता धारकांवर मनपा कोणतीही कारवाई करत नव्हती. मात्र अशा नागरिकांची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार महापालिकेला प्राप्त झाले आहे. तसेच या मालमत्तांचा लिलावही महापालिका करू शकते. 1 डिसेंबर रोजी यासंबंधीचा ठराव घेण्यात आला.

जप्तीनंतर मालमत्तांचा लीलावही होणार

कर थकवणाऱ्या ज्या म मालमत्ता महापालिकेने जप्त केल्या आहेत, त्यांची यादी तयार करून त्यास प्रशासकांची मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर जाहीर प्रगटन दिले जाईल. लिलावाच्या दिवशी किमावन दोन बोलीदार हजर असणे आवश्यक आहे. बंद लिफाफ्याद्वारे बोली लावण्यात आल्याची नोंद घेऊन त्यांची बोली अंतिम गणली जाईल. या लिलावाची चित्रफीत तयार करून एक वर्षापर्यंत जतन करून ठेवण्यात येईल. तसेच लिलावानंतर मामलत्ता हस्तांतरणाची प्रक्रियाही राबवली जाईल. मालमत्तेची आधारभूत किंमतीतून आलेल्या रकमेचे समायोजन करण्याचे नियमही महापालिकेने बनवले आहेत.

इतर बातम्या-

New delhi : गाडी थांबवायला सांगितल्यावरही थांबवली नाही, त्यामुळे दुर्घटना, नागालँड गोळीबारावर शहांचं उत्तर

Mumbai : राज्यातलं सरकार काँग्रेसच्या जीवावर, 28 डिसेंबरला राहुल गांधी मुंबईत-भाई जगताप

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.