School News: अंगणवाडी बालकांच्या पोषण आहारात मृत उंदीर, औरंगाबादमधील प्रकार, पालक संतप्त!

औरंगाबादमधील वाळूज परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंगणवाडीतील बालकांना मिळालेल्या पोषण आहार पाकिटात मृत उंदीर आढळून आले आहेत.

School News: अंगणवाडी बालकांच्या पोषण आहारात मृत उंदीर, औरंगाबादमधील प्रकार, पालक संतप्त!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 11:07 AM

औरंगाबादः राज्यभरात अंगणवाडीच्या माध्यमातून सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना पोषण आहार पुरवला जातो. मात्र औरंरगाबादमधील वाळूज परिसरातील एका अंगणवाडीतील बालकाला दिलेल्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळून आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पाद्वारे या पोषण आहाराचा पंचनामा करण्यात आला.

वाळूज गावातील प्रकार

28 डिसेंबर रोजी वाळूज गावातील अंगणवाडी क्रमांक 1 येथून लाभार्थी बालकांना पोषण आहाराची पाकिटं वाटप करण्यात आली. यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्या विद्या जोशी यांनी आराध्यक्षा अहिरे हिच्या पालकाकडे पोषण आहाराची पाकिटे दिली. आराध्याच्या शेजारीच राहणाऱ्या अन्य दोघांचीही पाकिटं देण्यात आली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास पालकांनी आहाराची पाकिटं फोडली असता, त्यातील गव्हाच्या पाकिटात मृत उंदीर सडलेल्या अवस्थेत आढळून आला. पालकांनी तत्काळ अंगणवाडीच्या दिशेने धाव घेतली.

Rat found in food

वाळूजमध्ये धक्कादायक प्रकार

पोषण आहाराचा पंचनामा

महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कोमल कोरे यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका सी.एच.खोचे यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. पर्यवेक्षिका खोचे यांनी अंगणवाडीला भेट देऊन पोषण आहाराची पाकिटे फोडून पाहिली. मात्र दुसऱ्या कुठल्याही पाकिटात गैरप्रकार आढळला नाही. मात्र या प्रकारामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या धान्यामुळे एखाद्या बालकाच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न लाभार्थी पालकांनी उपस्थित केला.

इतर बातम्या-

Video : टोले देत-घेत, दोन देत चार घेत असं उत्तमप्रकारे अधिवेशन पार पडलं : संजय राऊत

Video| माणुसकीला काळीमा, स्मशानातच सरणाची लाकडे घेऊन तुंबळ हाणामारी; नाशिकमध्ये कवी पाठारेंच्या अंत्यसंस्काराप्रसंगी आक्रीत

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.