Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: मुकुंदवाडीकरांचा 15 किलोमीटरचा हेल्पाटा कधी थांबणार? एक्सप्रेस गाड्या थांबवण्यास रेल्वेचा पुन्हा नकार!

एक्सप्रेस गाड्या येथेही थांबाव्यात अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी लावून धरली आहे. मात्र व्यावसायिकदृष्ट्या ते योग्य नसल्याचे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Aurangabad: मुकुंदवाडीकरांचा 15 किलोमीटरचा हेल्पाटा कधी थांबणार? एक्सप्रेस गाड्या थांबवण्यास रेल्वेचा पुन्हा नकार!
मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 3:28 PM

औरंगाबादः मुकुंदवाडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एक्सप्रेस रेल्वेने (Express Railway) प्रवास करायचा असल्यास त्यांना औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर (Aurangabad railway station) यावे लागते. कारण कोणत्याही एक्सप्रेस रेल्वे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर थांबत नाही. त्यामुळे एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करायचा असल्यास येथील नागरिकांना 15 किलोमीटरचा हेल्पाटा घालत औरंगाबाद स्टेशनवर यावे लागते. एक्सप्रेस गाड्या येथेही थांबाव्यात अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी लावून धरली आहे. मात्र व्यावसायिकदृष्ट्या ते योग्य नसल्याचे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

स्टेशनला D दर्जा मिळून पाच वर्षे झाली

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनला डी दर्जा मिळून पाच वर्ष लोटली आहेत. मात्र अद्यापपर्यंत स्टेशनला एक्सप्रेस रेल्वेचा थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे सिडको, मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. जवळ स्टेशन असताना मुख्य रेल्वे स्टेशन गाठावे लागते. औरंगाबाद रेल्वे स्टेशन ते मुकुंदवाडी हे अंतर जवळपास 15 किलोमीटर आहे. सध्या मराठवाडा एक्सप्रेस ही एकमेल एक्सप्रेस आणि इतर पॅसेंजर रेल्वे येथे थांबतात. या स्टेशनवरून दररोज तीन ते पाच हजारांपर्यंत प्रवासी ये-जा करतात. येथे स्वतंत्र वेटिंग रुम आहे. तसेच प्लॅटफॉर्मवर पत्रेही बसवण्यात आले आहेत. तसेच रिझर्व्हेशनसाठी पीआरएसची सुविधाही देण्यात आली आहे. मात्र येथे अद्याप एक्सप्रेस थांबण्याची परवानगी मिळालेली नाही.

अधिकाऱ्यांचे आश्वासन विसरले

दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी औरंगाबादेत पाहणी करताना मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर तपोवन एक्सप्रेस थांबवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु रेल्वे अदिकारी हे आश्वासन विसरले. इतर ठिकाणी चार-चार किमी अंतरावर एक्सप्रेस थांबवल्या जातात, मग मुकुंदवाडीलाच का नाही, असा सवाल मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी केले आहे. दरम्यान, तपोवन, जनशताब्दी आणि नंदीग्राम एक्सप्रेसला थांबा देणे हे व्यावसायिक दृष्ट्या योग्य नाही, त्यामुळे थांबा देणे व्यवहार्य नसल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इतर बातम्या-

Why I killed Gandhi : म्हणून मी नथुरामच्या विचारांचं उदात्तीकरण करतो, असं वाटत नाही : खा. अमोल कोल्हे

जळगावात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 2 मजुरांचा होरपळून मृत्यू, प्रचंड आवाजाने शेतकरी हादरले

सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले.
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका.
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण...
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण....
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी.
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ.