Aurangabad: गुप्तधनाचे अमिष,10 लाख उकळले, पैसे परत मागितले तर म्हणे कोंबडा बनवतो, भोंदूला अटक!

आधी घरात शांतता नांदण्यासाठी आणि त्यानंतर गुप्तधनाचे अमिष दाखवत परभणी येथील एका नागरिकाकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबाला ताब्यात घेतले असून या टोळीत आणखी कितीजण आहेत, याचा तपास सुरु आहे.

Aurangabad:  गुप्तधनाचे अमिष,10 लाख उकळले, पैसे परत मागितले तर म्हणे कोंबडा बनवतो, भोंदूला अटक!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 10:47 AM

औरंगाबादः तुमच्या घरात 96 किलो गुप्तधन (Guptdhan) असून ते शोधण्यासाठी 9 लाख 95 हजार रुपये उकळणाऱ्या भोंदूबाबाला औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police ) अटक केली. परभणीहून गुप्तधनाची पाहणी करण्यासाठी तो औरंगाबादला आला होता. त्यासाठी फिर्यादीकडून लाखो रुपये उकळले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे कळताच फिर्यादीने पोलिसात तक्रार दाखल केली.

भोंदूबाबानं कसं अडकवलं जाळ्यात?

याबाबत शेख रफत शेख करीम (गवळीपुरा, छावणी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरात सतत अशांतता आणि वाद होते. त्यामुळे मित्राने त्यांना मानवत येथील सायलू महाराजांची भेट घडवून दिली. जून महिन्यात रफत, त्यांची पत्नी आणि मित्र मानवतला गेले. परंतु त्यांना सीताराम महाराज भेटला. तेथे ‘तुमच्यावर करणी केली आहे,’ असे सांगून सीतारामने औरंगाबादमध्ये येऊन पाहणी करण्यासाठी 96 हजार रुपये मागितले. त्यानुसार रफत यांनी पैसे दिले. त्यानंतर सीताराम महाराज, शंकर, महाराज आणि इतर औरंगाबादेत आले.

घरात गुप्तधन असल्याचे अमिष

औरंगाबादेत आल्यानंतर तुमच्या घरावर सापाचा साया आहे, घरात 96 किलो गुप्तधन आहे, ते काढून देण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार वेळोवेळी सोन्याचे दागिने आणि पैसे मागितले. अखेर रफत यांनी परभणीत सीताराम महाराजांची भेट घेऊन त्यांना पैसे परत मागितले. पण पैसे परत मिळणार नाही. माझ्याकडे अघोरी विद्या आहे. त्याची कोठेही वाच्यता केली तर कोंबडा बनवीन, अशी धमकी दिली. त्यानंतर रफत यांनी या सर्व प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दाखल केली.

सखोल तपासासाठी पोलीस कोठडी

या भोंदूबाबला पोलिसांनी अटक केली असून त्याला 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा आता पोलीस सखोल तपास करत आहेत.

इतर बातम्या

Health Tips : तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ 5 पदार्थांचा समावेश करा!

बसची सिमेंट बल्करला धडक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चार गाड्यांचा विचित्र अपघात, तिघांचा मृत्यू

Clean Nagpur | घरीच करा कचऱ्याची विल्हेवाट, अन्यथा 15 पासून कचरा उचलणार नाही?

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.