Aurangabad: ना डॉक्टरांची चिठ्ठी, ना औषधांची बिलं, औरंगाबादेत नशेच्या गोळ्यांची सर्रास विक्री, एकाला बेड्या

तौफिककडे औषधींची बिलं, डॉक्टरांची कुठलीही चिठ्ठी नव्हती. यापूर्वीही पोलिसांनी एमआर, मेडिकल एजन्सीवरील सेल्समनला नशेच्या गोळ्या आणि औषधी विक्री करताना अटक केली आहे. शहरात औषधी विक्री क्षेत्रातील अनेकजण हा गोरखधंदा करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Aurangabad: ना डॉक्टरांची चिठ्ठी, ना औषधांची बिलं, औरंगाबादेत नशेच्या गोळ्यांची सर्रास विक्री, एकाला बेड्या
पुण्यात येरवडा कारागृहात पोक्सो गुन्ह्यातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 1:48 PM

औरंगाबादः मेडिकल एजन्सीकडे काम करणारा एक सेल्समन (Aurangabad Salesman) डॉक्टरांच्या कोणत्याही चिठ्ठीशिवाय नशेच्या गोळ्या विक्री करत असल्याची घटना औरंगाबादेत (Aurangabad drugs) उघड झाली. गंभीर आजारांसाठी वापरली जाणाऱ्या काही टॅबलेट आणि पातळ औषधांच्या बाटल्या या सेल्समनकडे आढळल्या. औरंगाबाद शहरातील तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी गेली आहे. नशेसाठी अशा औषधीही वापरल्या जात आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी उस्मानपुऱ्यात सदर (Osmanpura police) सेल्समनवर कारवाई केली. तौफिक रफिक फारोखी असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तौफिककडे औषधींची बिलं, डॉक्टरांची कुठलीही चिठ्ठी नव्हती. यापूर्वीही पोलिसांनी एमआर, मेडिकल एजन्सीवरील सेल्समनला नशेच्या गोळ्या आणि औषधी विक्री करताना अटक केली आहे.

नशेच्या 870 गोळ्या अन् पातळ औषध

या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव तौफिक रफिक फारोखी असे असून तो नारेगाव येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून विक्रीसाठी आलेल्या 870 गोळ्या आणि पाच पातळ औषधींच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक गीता बागवडे यांना खबऱ्यामार्फत मेडिकल एजन्सीवरील सेल्समन नशेसाठी औषधी पुरवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, बागवडे यांच्या सूचनेनुसार 31 जानेवारी रोजी प्रवीण वाघ यांनी पथकासह सापळा रचला. प्रताप नगर मैदानावर रात्री साडेनऊ वाजता तौफिक दुचाकीवरून एजंटला गोळ्या देण्यासाठी आला. तो अंधारात उभा असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

ना डॉक्टरांची चिठ्ठी ना औषधांची बिलं

तौफिकजवळील पिशवीत प्रिस्क्रिप्शन ड्रग प्रकारातील औषधली. ही औषधं केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिली जातात. मानवी शरीरासाठी ती धोकादायक आहेत. मात्र या औषधींचा नशेसाठीही वापर केला जात आहे. तौफिक एजन्सीमधून वितरकांना इतर औषधींमधून नशसेच्या गोळ्या आणि औषधी परस्पर विक्री करत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तौफिककडे औषधींची बिलं, डॉक्टरांची कुठलीही चिठ्ठी नव्हती. यापूर्वीही पोलिसांनी एमआर, मेडिकल एजन्सीवरील सेल्समनला नशेच्या गोळ्या आणि औषधी विक्री करताना अटक केली आहे. शहरात औषधी विक्री क्षेत्रातील अनेकजण हा गोरखधंदा करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या-

शॉर्टसर्किटमुळं दहा ते बारा एकर ऊस जळून खाक, टॅक्टरही जळाला; महावितरणाचा गलथान कारभार

मास्क घालूनही चिमुकल्यानं खाल्लं लॉलीपॉप, ‘असा’ अफलातून जुगाड पाहिला नसेल! Video Viral

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.