Aurangabad | कोट्यवधी रुपये घेऊन गायब झालेल्या तरुणाच्या वडिलांचे अपहरण, 30-30 घोटाळ्याशी संबंध?
वडिलांचे अपहरण झाल्यानंतर मुलगा सचिन चव्हाण याला एक कोटी रुपयांची व्यवस्था करा, असा फोन आला होता. मात्र त्यावर पुन्हा कॉल केला असता तो बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर सचिन यांनी सातारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती.
औरंगाबादः जिल्ह्यातील 30-30 योजनेअंतर्गत 90 लाखांहून अधिक रक्कम घेऊन, दोन ते तीन महिन्यांपासून गायब असलेल्या तरुणाचे अपहरण (Kidnapping) झाल्याची घटना गुरुवारी घडली. दुपारी चार वाजेच्या सुमारास या तरुणाच्या वडिलांचे बीड बायपास (Beed bypass) येथील पेट्रोल पंपाच्या जवळून अपहरण करण्यात आले. सदर वडिलांच्या दुसऱ्या मुलाने तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) गुन्हा दाखल केला. मात्र दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी 15 एप्रिल रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास अपहृत व्यक्तीला पैठण रोडवरील (Paithan Road) उड्डाणपुलाच्या खाली सोडून देण्यात आले. 30-30 प्रकरणातील देवाण-घेवाणीच्या वादातून हे अपहरण नाट्य घडल्याचा पोलिसांचा संशय आहे.
काय घडला नेमका प्रकार?
कृष्णा बन्सी चव्हाण (रा. बीड बायपास) असे अपहृत व्यक्तीचे नाव आहे. ते एका संस्थेत अधीक्षकांचे मदतनीस म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा सचिन कृष्णा चव्हाण याने यासंबंधीची फिर्याद दाखल केली आहे. कृष्णा हे 14 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता क्रेटा कार घेऊन बाहेर पडले. संध्याकाळी पाच वाजता ते बीड बायपासवरील बँक ऑफ बडोदासमोर उभी असल्याचा फोन सचिन यांना आला होता. त्यानंतर सचिन यांनी जाऊन पाहणी केली असता त्यांची कार तेथेच पेट्रोल पंपासमोर उभी होती. आजूबाजूला चौकशी केली असता एका हॉटेलच्या वॉचमनने या कारमधील व्यक्तीला दुसऱ्या कारमधून आलेल्या दोघांनी बळजबरी त्यांच्या कारमध्ये बसवून नेल्याचे सांगितले.
30-30 प्रकरणाशी संबंध?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनचा मोठा भाऊ अमोल चव्हाण याने 30-30 प्रकरणात जांभळा परिसरातून जवळफास 80 ते 90 लाख रुपये गोळा केले होते. ज्यांच्याकडून रक्कम गोळा करण्यात आली त्यांना अद्याप ही रकक्म परत मिळाली नाही. त्यामुळे ज्यांनी पैसे दिले, त्यांनी अमोलकडे तगादा लावला. याला वैतागून अमोल दोन महिन्यांपासून गायब आहे. आता अमोल सापडत नसल्याने पैसे मागणाऱ्यांनी त्यांच्या वडिलांनाही अपहृत केले असावे, असा पोलिसांचा संशय आहे.
‘एक कोटी रुपयांची व्यवस्था करा’
वडिलांचे अपहरण झाल्यानंतर मुलगा सचिन चव्हाण याला एक कोटी रुपयांची व्यवस्था करा, असा फोन आला होता. मात्र त्यावर पुन्हा कॉल केला असता तो बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर सचिन यांनी सातारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती.
इतर बातम्या-