Aurangabad | पाणी प्रश्न तेव्हाही होता, 400 वर्षांपूर्वी मलिक अंबरनं प्रचंड विरोधातही दगडांना पाझर फोडला अन् तत्कालीन ‘खडकी’ला सुजलाम् सुफलाम् केलं होतं…

नैसर्गिकरित्या रेती आणि चुन्यातून वाहणारे पाणी शुद्ध, स्वच्छ आणि जंतुमुक्त व प्रदूषणमुक्त होत असल्याचा शोध मलिक अंबरने त्या काळी लावला होता. याच तंत्राचा पुरेपुर वापर मलिक अंबरने केला.

Aurangabad | पाणी प्रश्न तेव्हाही होता, 400 वर्षांपूर्वी मलिक अंबरनं प्रचंड विरोधातही दगडांना पाझर फोडला अन् तत्कालीन 'खडकी'ला सुजलाम् सुफलाम् केलं होतं...
नहर ए अंबरीचे जूने छायाचित्र
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 5:41 PM

औरंगाबादः वर सूर्याची आग अन् शहरात राजकारणाचा ताप. औरंगाबादेत पाणी प्रश्नावरून (Aurangabad water problem) राजकारण्यांनी अक्षरशः आग लावलीय. आरोप-प्रत्यारोप, सभा, मोर्चांनी हा प्रश्न सुटणारा नाहीच. दोन दिवस शक्ती प्रदर्शन होईल, एकमेकांचे उट्टे काढले जाईल आणि पुन्हा जैसे थे. औरंगाबादचा पाणी प्रश्न इथेच संपणारा नाही. त्यासाठी आवश्यक आहे ते पाणीपुरवठ्याचं (water supply) योग्य नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि मुख्य म्हणजे प्रश्न सोडवण्याची तळमळ. ही तळमळ जोपर्यंत नसते तोपर्यंत कोणतीही समस्या सुटत नाही. हीच तळमळ दाखवली होती 400 वर्षांपूर्वी मलिक अंबरनं (Malik Ambar). दख्खनच्या निजामाची चाकरी करणाऱ्या या बुद्धिवंतानं आपल्या कौशल्यातून अख्खं खडकी शहर (आताचं औरंगाबाद) वसवलं. एवढंच नाही तर इथल्या उजाड, वैराण जमिनीवर नहरींची व्यवस्था करून खडकीला सुजलाम् सुफलाम् केलं होतं…

कोण होता मलिक अंबर?

औरंगाबादच्या इतिहास तज्ज्ञ दुलारी कुरेशी यांनी लिहिलेल्या “औरंगाबादनामा’नुसार, मलिक अंबर हा अॅबेसीनिया देशातील अत्यंत गरीब कुटुंबातला होता. त्या काळी गुलामांना विकण्याची प्रथा होती. मलिक अंबरच्या वडिलांनी एका व्यापाऱ्याकडे त्याला विकले. बालपणापासून अत्यंत हुशार असलेल्या मलिक अबंरचं कौशल्य दिसून आलं. मालकानं त्याला प्रशिक्षण दिलं. मलिक अंबरला लढण्यासाठी दुसऱ्या देशात पाठवलं. त्यानंतर त्याची अनेकदा विक्री झाली. भारतात आल्यावर चंगेज खान नावाच्या व्यक्तीने त्याला विकत घेतलं. हा चंगेज खान अहमदनगरच्या सुलतानाकडे मंत्री म्हणून कामाला होता आणि त्या आधी तो एक गुलामच होता. भारतात दुसऱ्या मूर्तझा निजाम शहाच्या सेवेत असताना त्याची प्रगती झाली. त्याच अधिकारांतून त्यानं तत्कालीन खडकी शहर वसवलं. 52 दरवाजे आणि 52 पुऱ्यांच्या या शहरातील नागरिकांना सिंचनाची व्यवस्था करण्यासाठीही त्यानं कौशल्य पणाला लावलं.

नहरींच्या योजनेला तेव्हा प्रचंड विरोध

17 व्या शतकात खडकी शहर वसवताना मलिक अंबरने जेव्हा नहरींच्या योजनेचा प्रस्ताव दरबारात मांडला. तेव्हा दरबारातील इतर मंत्र्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला होता. पाषाणातून पाण्याचा झरा काढण्याची योजना म्हणजे ग्रहताऱ्यांतून पाणी काढण्यासारखे आहे, अशी खिल्ली उडवण्यात आली होती. पण या अपमानानं मलिक अंबर पेटून उठला. कल्पनेतील नहरांना मूर्त रुप देण्यासाठी त्यानं सारी कौशल्य पणाला लावली. गुरुत्वीय तंत्रज्ञानाचा विशेष अभ्यास करून त्याने शहरात नहरींचे बांधकाम करण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

नहरींची निर्मिती अशी झाली..

मलिक अंबरनं तत्कालीन शहराच्या उतत्रेस असलेल्या बनटेकडीपासून नहरींच्या निर्मितीला सुरुवात केली. टेकडी परिसरातील पाषाणी भाग कोरून भूगर्भात एक जलाशय तयार करण्यात आला. पाषणातून पाझरणाऱ्या झऱ्यांचे पाणी तसेच जवळपासच्या नदीनाल्यांचे पाणी या जलाशयात साठवण्यात आले. या जलाशयाची खोली अंदाजे 45 फूट एवढी आहे. उंच भागावरून हे पाणी सहजपणे जलाशयात साठत होते. येथून मातीच्या पाइपद्वारे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जात असे.

Malik Ambar

खुलताबाद येथील मलिक अंबरची कबर

पाण्याला गती देण्याचे तंत्र

उंचावरून खालच्या दिशेने प्रवाहित होणे हा पाण्याचा गुणधर्म. नहरींची निर्मिती याच गुणधर्माने करण्यात आली. भूमीगत असलेल्या थोड्या-थोड्या अंतरावरील नळांवर मनोरे बांधम्यात आले. उंचावरून वहात खाली आलेले पाणी एका विशिष्ट गतीने मनोऱ्याच्या ठिकाणी परत उंचावर चढते आणि याची गती आणखी जास्त वाढते. पूर्वीपेक्षाही जास्त गतीने पुढे वाहत जाते.

स्वच्छ व निर्मळ पाणी

या नहरीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, आरोग्यासाठी उपयुक्त स्वच्छ आणि निर्मळ पाणी मिळवून देण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आला. नैसर्गिक रित्या रेती आणि चुन्यातून वाहणारे पाणी शुद्ध, स्वच्छ आणि जंतुमुक्त व प्रदूषणमुक्त होत असल्याचा शोध मलिक अंबरने त्या काळी लावला होता. याच तंत्राचा पुरेपुर वापर मलिक अंबरने केला. एकूणच मलिक अंबरने पूर्णपणे नैसर्गिक स्रोतांचा आणि तंत्राचा उत्तमोत्तम वापर करून कमीत कमी खर्चात आणि कमी वेळेत वैशिष्ट्यपूर्ण नहर बांधली. नंतरच्या काळात लोकसंख्या वाढीनुसार, पाण्याची गरज वाली आणि नहर ए अंबरीच्या आधारावर नंतरच्या काळात मोगल बादशहा आणि निझामाच्या काळातही नहरी बांधण्यात आल्या. अर्थात मलिक अंबरने नहर बांधमीचा पाया रोवला आणि याच तंत्राचा वापर करत शहरात अनेक नहरी बांधण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण औरंगाबाद शहराची तहान भागवण्याचे काम नहरींद्वारे केले जात असे.  (संदर्भ- औरंगाबाद नामा- लेखक- डॉ. रफत कुरेशी, डॉ. दुलारी कुरेशी)

Panchakki, Aurangabad

पाणचक्की येथील हौद

नहरी नामशेष, जुनी पाणीपुरवठा योजनाही जीर्ण

मलिक अंबरने बांधलेल्या दोन प्रमुख नहरी होत्या. एक नहर ए अंबरी आणि दुसरी म्हणजे पाणचक्की परिसरातील नहर. पाणचक्की परिसरात तर पाण्याच्या प्रवाहातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर करून चक्की अर्थात दळणाचे जाते फिरवण्यात आले होते. सुमारे चार मैलांवरून नहरींच्या माध्यमातून इथे पाणी आणण्यात आलं. येथील नहरींचे पाइप खापराचे आहेत. हे पाणी साठवण्यासाठी 162 फूट लांब आणि 31 फूट रुंद तर चार फूट खोलीचा हौद आहे. हौदात पडलेल्या पाण्याचे आउटलेट खाम नदीत सोडण्यात आलं. हौदाच्या मागील बाजूला उद्यान, दोन मोठे हॉल आहेत. वास्तुशास्त्राचा हा उत्तम नमूना आहे. मात्र योग्य संवर्धन न केल्यामुळे या दोन प्रमुख नहरींसह इतरही लहान-मोठ्या नहरी नामशेष झाल्या आहेत. त्या पुनर्जिवीत करण्यासाठी मलिक अंबरासारखा दुसरा कुशल अभियांत्रिक किंवा पाणी समस्या सोडवण्यासाठी तळमळ असलेलीच व्यक्ती हवी. सध्या तरी 1992-93 मधील जुनी पाणीपुरवठा योजना अत्यंत जीर्णावस्थेत आहे. राज्य सरकारने मंजूर केलेली 1680 कोटींची योजना कधी पूर्ण होतेय, याची वाट पाहण्याशिवाय औरंगाबादकरांना गत्यंतर नाही.

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.