Aurangabad | डॉ. भागवत कराडांचं राज ठाकरेंना निमंत्रण, कराड यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला राज ठाकरे जाणार का?
गेल्या काही दिवसांपासून भाजप सोडून इतर पक्षांवर राज ठाकरे यांनी कडाडून टीका केलीय. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चांनाही उधाण आलंय. आता औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांना भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भागवत कराड यांनी निमंत्रण दिलंय.
औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शन कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय केणेकर (Sanjay Kenekar) यांच्यातर्फे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना रिसेप्शनची पत्रिका देण्यात आली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी अमित ठाकरेंची ओळख करून दिली. तसेच संजय किणीकरांनी त्यांना आज संध्याकाळी होणाऱ्या रिसेप्शन समारंभाचं आमंत्रण दिलंय. राज ठाकरे यांचं औरंगाबादमध्ये आगमन झालं असून आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचं आमंत्रण स्वीकारून ते या कार्यक्रमाला हजेरी लावणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वरुण कराड यांच्या लग्नाचं रिसेप्शन
डॉ. भागवत कराड यांचा सर्वात लहान मुलगा वरुण कराड यांच्या लग्नाचा स्वागत समारंभ आज औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आला आहे. औरंगाबाद विमानतळ जवळील खिवंसरा लॉन्स परिसरात हा समारंभ आयोजित कऱण्यात आला आहे. या समारंभात भाजपचे अनेक नेते आणि दिग्गज मंत्री उपस्थिती लावणार आहेत. उद्या होणाऱ्या सभेनिमित्त राज ठाकरे औरंगाबादमध्ये आले आहेत. त्यामुळे डॉ. भागवत कराड यांच्यामार्फत त्यांनाही रिसेप्शनसाठीचं आमंत्रण देण्यात आलं आहे.
राज ठाकरे रिसेप्शनला जाणार का?
गेल्या काही दिवसांपासून भाजप सोडून इतर पक्षांवर राज ठाकरे यांनी कडाडून टीका केलीय. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चांनाही उधाण आलंय. आता औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांना भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भागवत कराड यांनी निमंत्रण दिलंय. त्यामुळे हे निमंत्रण स्वीकारून राज ठाकरे रिसेप्शनला जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खासदार जलील यांच्याकडून इफ्तारचं निमंत्रण
दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचंही निमंत्रण दिलं आहे. यावर राज ठाकरे यांची अद्याप काही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र मी सर्वच राजकीय पक्षांना इफ्तार पार्टीचं आमंत्रण देत असतो. राज ठाकरेंनी हे आमंत्रण स्वीकारलं तर सर्व धर्मसमभावाचा संदेश जनतेत जाईल, असं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय.