Raj Thackeray | राज ठाकरेंची औरंगाबाद सभा, भोंग्यांचे राजकारण हा दंगली घडवण्याचा डाव, RPI पाठोपाठ राष्ट्रवादीचाही आक्षेप,

राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातल्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर एक मे रोजी सभा घेण्याचे घोषित केले आहे. औरंगाबाद शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयारीला लागली आहे.

Raj Thackeray | राज ठाकरेंची औरंगाबाद सभा, भोंग्यांचे राजकारण हा दंगली घडवण्याचा डाव, RPI पाठोपाठ राष्ट्रवादीचाही आक्षेप,
मनसे अध्यक्ष राज ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 12:33 PM

औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुढची प्रचंड मोठी सभा औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. येत्या 1 मे रोजी ही सभा घेतली जाईल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी पुण्यात केली. विशेष म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Banasaheb Thackeray) यांची गाजलेली सभा ज्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर घेण्यात आली होती, तेथेच राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर औरंगाबाद मनसेचे पदाधिकारी कामालाही लागले आहेत. मात्र मशीदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून (Hanuman Chalisa) राजकारण करून शहरात दंगली घडवण्याचा हा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपची सुपारी घेऊन असे काम करत असल्याचा आरोपही औरंगाबाद राष्ट्रवादीने केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षातर्फे औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी राज्य सरकारला करण्यात आली आहे. त्यात राष्ट्रवादीनेही राज ठाकरेंच्या धोरणांवर आक्षेप घेतला आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी काय म्हणाले?

राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये सभा होणार असल्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सरचिटणीस मुश्ताक अहमद म्हणाले, राज ठाकरे यांचा पक्ष संपला असून त्यांना आत फारसे काम नाही. भारताच्या स्वातंत्र्यापासून सर्व समाज एकत्र राहत आहेत, राज ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. तर औरंगाबादचे शहराध्यक्ष ख्वाजा शरीफउद्दीन म्हणाले, राज ठाकरे यांना कोणतेही धोरण नाही. दोन समाजात दंगल घडवण्याचा प्रयत्न करायचा आणि महाविकास आघाडीच्या सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. संपूर्ण भाजपाचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

RPI- खरात गटाची मागणी काय?

राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबादमध्ये परवानगी देऊ नये, अशी मागणी आरपीआयचे सचिन खरात यांनी राज्य सरकारकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे सर्व धर्म समभाव मानणारे आहे. राज ठाकरे वारंवार सामाजिक वक्तव्याच्या नावाखाली धार्मिक वक्तवे करत आहे. आता राज ठाकरे हे औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत परंतु औरंगाबाद क्रांतीभूमी आणि नामांतर भूमी आहे या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आणि गुण्यागोविंदयाने राहतात त्यामुळे धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंना औरंगाबाद मधील सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) राज्य सरकारला करत आहे.

सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा

राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातल्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर एक मे रोजी सभा घेण्याचे घोषित केले आहे. औरंगाबाद शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयारीला लागली आहे. लवकरच यासंदर्भातील परवानग्या मिळवल्या जातील असे शहराध्य सुमित खांबेकर यांनी सांगितले. परवानगी मिळाली नाही तरी राज ठाकरे यांची सभा घेतली जाईलच, असा इशाराही मनसेने दिला आहे.  सांस्कृतिक मंडळाच्या याच मैदानावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभाही प्रचंड गाजलेल्या आहेत. आता राज ठाकरेंनीही त्याच ठिकाणी विराट सभा घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे असेल.

इतर बातम्या-

Raj Thackeray Effect : राज ठाकरे इफेक्ट, नाशिकचा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवण्याची तयारी, गृहमंत्र्यांची डीजींसोबत बैठक, एसपी, आयुक्तांना आदेश

Pune : पीएमपीएमएलतर्फे आज ‘बस डे’चं आयोजन, 250 ज्यादा बसेस धावणार, महिलांना मोफत प्रवास

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.