Aurangabad | कुलसचिव जयश्री सूर्यवंशी यांचे पद धोक्यात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University) कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी (Jayashri Suryawanshi) यांचे कुलसचिव पद धोक्यात आले आहे.

Aurangabad | कुलसचिव जयश्री सूर्यवंशी यांचे पद धोक्यात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काय घडतंय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 11:44 AM

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University) कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी (Jayashri Suryawanshi) यांचे कुलसचिव पद धोक्यात आले आहे. जयश्री यांच्या महाविद्यालयातील प्रथम नियुक्तीवर उच्चस्तरीय चौकशी समितीने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले (Dr. Pramod Yewle) यांना दोन दिवसात अभिप्राय कळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या उपसचिवांचे यासंदर्भातील पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे डॉ. जयश्री यांचे पदावर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. रिपब्लिकन कार्यकर्ता नागराज गायकवाड यांनी इं.भा. पाठक महाविद्यालयातील डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या प्रथम नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.

काय आहे नेमका आक्षेप?

रिपब्लिकन कार्यकर्ता नागराज यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार, डॉ. जयश्री सूर्यवंशी या खुल्या प्रवर्गातील आहेत. मात्र महाविद्यालयात अधिव्याख्याताच्या प्रथम नियुक्तीसाठी त्यांनी विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील राखीव जागेचा फायदा घेतला. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी त्यांची महाविद्यालयीन सेवा ग्राह्य धरण्यात येऊ नये, असा आक्षेप शपथपत्राद्वारे नागराज गायकवाड यांनी उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांना सादर केला आहे. मंत्री सामंत यांच्या आदेशानुसा, याप्रकरणी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय नियुक्त केली. या समितीने चौकशी केल्यानंतर उच्चशिक्षण मंत्रालयाकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला.

चौकशीतून काय समोर आले?

शासनाने 17 फेब्रुवारी रोजी संचालक डॉ. धनराज माने यांना एका पत्राद्वारे सूचना केली की, डॉ. सूर्यवंशी यांची सदर महाविद्यालयातील नियुक्ती जाहिरातीतील विहित आरक्षण डावलून, विहित अर्हता पूर्ण होत नसतानाही तात्पुरत्या स्वरुपात केली गेली. यासंदर्भात कारवाईकरिता कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा मोबाइल बंद असल्यामुळे तो होऊ शकला नाही, अशी माहिती हाती आली आहे.

कुलगुरूंना दोन दिवसात अभिप्राय द्यावा लागणार

सदर महाविद्यालयातील प्राचार्यांना डॉ. जयश्री यांच्या नियुक्तीबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच 21 फेब्रुवारी रोजी कुलगुरुंनाही यासंदर्भातील अभिप्राय देण्याबाबत कळवण्यात आले होते. त्यानंतर आता 11 मार्च रोजी पुन्हा स्मरणपत्र पाठवून कुलगुरुंकडून आता दोन दिवसात अभिप्राय मागवण्यात आला आहे.

इतर बातम्या-

पोलिस उपनिरीक्षक वाशिमला, अमरावतीत पत्नीची आत्महत्या, आईचा मृतदेह पाहून लेकरांचा टाहो

Nashik | नाव मोठे लक्षण खोटे; सुप्रसिद्ध मेकअप क्लासच्या संचालकाचा महिलेवर बलात्कार

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.