School Open| औरंगाबादेत कोरोनाची लाट ओसरतेय? शहरात सोमवारपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग भरणार, महापालिकेचा निर्णय

जिल्हा परिषदेच्या टास्क फोर्सने ग्रामीण भागात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास 24 जानेवारीला परवानगी दिली होती. त्यानुसार, ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र हिवाळ्यामुळे जिल्हाभरात थंडीची तीव्र लाट सुरु असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी जाणवत आहे.

School Open| औरंगाबादेत कोरोनाची लाट ओसरतेय? शहरात सोमवारपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग भरणार, महापालिकेचा निर्णय
School
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 10:13 AM

औरंगाबादः शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण अचानक वाढू लागल्याने महिनाभरापूर्वी सुरु झालेल्या शाळांना पुन्हा एकदा ब्रेक लागला होता. मात्र आता कोरोना बाधितांचे प्रमाण कमी दिसून येत असल्याने शहरातील शाळा (Aurangabad School) टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने (Aurangabad Municipal Corporation) घेतला आहे. याच प्रक्रियेत सोमवारपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात यावेत, अशी परवानगी महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी दिली आहे. या वर्गातील 15 ते 18 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना उपस्थितीसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेणे आवश्यक आहे, अशी अटही महापालिकेच्या वतीने घालण्यात आली आहे.

दहावी-बारावीचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरु

दरम्यान, शहरातील दहावी आणि बारावीचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरू झाले आहेत. पहिल्या दिवशी या वर्गांना अनुक्रमे 25 आणि 15 टक्के उपस्थिती होती. 26 जानेवारीनंतर गेल्या दोन दिवसात उपस्थिती वाढण्यास सुरुवात झाली असून सध्या शाळा, महाविद्यालयांमध्ये सराव परीक्षांच्या तयारीची लगबग सुरु आहे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता काहीशी ओसरल्याचे चित्र असल्यामुळे येत्या आठवड्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे.

ग्रामीण भागातील स्थिती काय?

जिल्हा परिषदेच्या टास्क फोर्सने ग्रामीण भागात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास 24 जानेवारीला परवानगी दिली होती. त्यानुसार, ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र हिवाळ्यामुळे जिल्हाभरात थंडीची तीव्र लाट सुरु असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी जाणवत आहे. आणखी काही दिवसांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा शिक्षण विभागाला आहे.

जिल्ह्यातले कोरोना रुग्ण किती?

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी 687 कोरोना बाधितांची भर पडली. यात शहरातील 665 तर ग्रामीण भागातील 350 एवढे रुग्ण आढळून आले. खासगी रुग्णालयात 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 7 हजार 588 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मागील दहा दिवसांचा आलेख पाहता शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होताना दिसतेय. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिका घेणार आहे.

इतर बातम्या-

Sambhaji Bhide | लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणाऱ्या न्यायाधीशाला संपवलं पाहिजे :संभाजी भिडे

Video | अंनिसमधील वाद चव्हाट्यावर, हमीद आणि मुक्ता दाभोळकर यांनी 7 कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा आरोप

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.