Aurangabad | आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी औरंगाबाद शिवसेना आक्रमक, सोमय्यांविरोधात घोषणाबाजी

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी 'सेव्ह विक्रांत' या मोहिमेच्या नावाखाली लाखो मुंबईकरांचा पैसा लुबाडल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्यानंतर किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेच्या वतीने (Shiv Sena) राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यातही त्याचे पडसाद दिसत आहेत.

Aurangabad | आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी औरंगाबाद शिवसेना आक्रमक, सोमय्यांविरोधात घोषणाबाजी
क्रांती चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 12:18 PM

औरंगाबाद | भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी ‘सेव्ह विक्रांत’ या मोहिमेच्या नावाखाली लाखो मुंबईकरांचा पैसा लुबाडल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्यानंतर किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेच्या वतीने (Shiv Sena) राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. औरंगाबादमध्येही शिवसेनेने क्रांती चौकात आंदोलन केलं. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली खंडणी गोळा करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली. भाजपविरोधात तसेच किरीट सोमय्या यांच्याविरोधात क्रांती चौकात घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

काय आहे नेमका आरोप?

2013-14 साली भारतीय संरक्षण खात्याची आयएनएस विक्रांत हे जहाज भंगारात काढले जाणार होते. त्यावेळी त्यात संऱक्षण खात्याचे संग्रहालय व्हावे, अशी मागणी पुढे आली. हे संग्रहालय उभे करण्यासाठी राज्य सरकारला 200 कोटी रुपये उभे करून देण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जनतेकडून निधी जमा केला. त्या वेळी जवळपास 57  कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ही रक्कम अद्याप राज्य सरकारकडे जमा झालेली नाही, असा आरोप संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे. त्यावेळी लाखो मुंबईकरांनी देशभावनेपोटी सढळ हाताने दान केले. हा लोकभावनेशी, देशभावनेशी खेळ असल्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.

711 बॉक्समधून पैसे गोळा केले- राऊत

आयएनएस विक्रांत घोटाळा उघड करण्यासाठी संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर गुरुवारीदेखील या घोटाळ्याचा अधिक तपशील दिला. विक्रांतच्या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. देशभरात पैसा जमा केला. महाराष्ट्रात 58 कोटींचा आकडा सांगितला. मात्र त्यापेक्षा जास्त निधी सोमय्यांनी जमा केला. हा पैसा निवडणुकीत वापरला. पीएमसी बँकेच्या माध्यमातून चलनातून आणला गेला. नील सोमय्यांच्या उद्योगात वापरला गेला. हे पैसे गोळा करण्यासाठी 711 मोठे बॉक्स वापरले गेले. हे बॉक्स त्यांच्या निलम नगरमधील कार्यालयात ठएवले. त्या पैशाचे बंडल बांधण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते बोलावले होते. हे एक प्रकारचं मनी लाँड्रिंगच आहे, असा आरोप संजय राऊत यांनी गुरुवारी केला.

हिंगोलीतही शिवसैनिकांचे आंदोलन

दरम्यान, आयएनएस विक्रांत घोटाळ्या प्रकरणी हिंगोलीतदेखील निदर्शने करण्यात आली. किरीट सोमय्या यांच्याविरोधात त्वरीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. हिंगोलीतील शिवसैनिकांनी यावेळी किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिकात्मक आंदोलन केले.

इतर बातम्या-

Accident CCTV | बघता-बघता टँकर थेट बसमध्ये घुसला, पुणे-यवतमाळ ट्रॅव्हल्सच्या अपघाताची भयंकर सीसीटीव्ही दृश्यं

INS Vikrant: गोळवलकर, देवरस, मुखर्जी, हेडगेवार, भागवतांचा जीव तीळ तीळ तुटला असेल; राऊतांची खोचक टीका

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.