Aurangabad | आमचा झेंडा भगवा, पण दिल हराभरा, शिवसेना मंत्री सत्तारांचा खा. इम्तियाज जलील यांना आशीर्वाद!
औरंगाबादः शहरातील नेहरू भवनाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात काल मोठे राजकीय नाट्य (Political Drama) रंगले. शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना तोंडभरून कोपरखळ्या मारल्या.
औरंगाबादः शहरातील नेहरू भवनाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात काल मोठे राजकीय नाट्य (Political Drama) रंगले. शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना तोंडभरून कोपरखळ्या मारल्या. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी भाषणादरम्यान मनोमिलनाचे संकेत दिले. खासदार जलील यांनी सत्तार यांना उद्देशून म्हटले की, तुमच्या आशीर्वादाने 2024 मध्ये अच्छे दिन येतील. तर शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनीही टोला मारत खासदार जलील यांना हिरवे झाड द्या. आमचा झेंडा भगवा असला तरी मन हिरले आहे, असं सूचक वक्तव्य केलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
खासदार जलील यांच्याकडून मंत्र्यांचे कौतुक
शहरातील बुढी लेन परिसरातील नेहरू भवन इमारतीच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन 25 फेब्रुवारी रोजी दुपारी झाले. त्यावेळी इम्तियाज जलील आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले. नेहरू भवन, वंदे मातरम सभागृह, हज हाऊसच्या कामासाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या पुनर्विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली. अब्दुल सत्तार यांनीही त्याला ग्रीन सिग्नल दिले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, जमीर कादरी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस.डी. पानझडे, नगररचना उपसंचालक ए.बी. देशमुख आदी उपस्थित होते.
मी जिकडे जातो, तिकडे ‘सत्ता’
नेहरू भवनाच्या भूमीपूजनावेळी भाषणादरम्यान, सत्तार यांनी राजकीय फटकेबाजी केले. ते म्हणाले, माझ्या नावातच सत्ता आहे. फक्त शेवटचा र अक्षर काढला पाहिजे. चिन्ह कोणतेही असो. घोड्याची लगाम माझ्याच हाती असते. 1983 पासून मी सत्तेतच आहे. तुमच्या नशीबात विरोधी बाकावर बसायचे लिहिले आहे. शहरात काही मुस्लीम नेत्यांनी राजकीय शर्यत जिंकण्याचा प्रयत्न केला, मात्र तुम्ही (जलील यांनी) लंगड्या घोड्यावर रेस जिंकली, असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला.
नेहरू भवन इमारतीच्या भूमीपूजन, बजेट काय?
शहरात 4800 चौरस मीटर नेहरू भवनाच्या पुनर्विकासासाठी 32 कोटी 1 लाख 93 हजार रुपये लागतील, असा अंदाज आहे. हाय टेक इन्फ्रा कंपनी 18 महिन्यांत हे काम करेल, अशी अपेक्षा आहे. यात 20 दुकाने, 12 कार्यालये, एक सभागृह, प्रदर्शन गॅलरी, भव्य पार्किंग असेल.
इतर बातम्या-