Aurangabad | नव्या निविदा अंदाज पत्रकापेक्षा कमी दराने, औरंगाबाद स्मार्ट सिटीचे 90 कोटी वाचले
स्मार्ट सिटीने ही कामे पूर्ण करण्यासाठी नऊ महिन्यांचा अवधी दिला आहे. यापैकी 18 कामांच्या निविदा अंतिम झाल्यानंतर आता कंत्राटदारांसोबत अनामत रक्कम जमा करण्यासंबंधी चर्चा सुरु करण्यात आली असल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.
औरंगाबाद| शहरात (Aurangabad city) नव्याने होऊ घातलेल्या विकास प्रकल्पांसाठी महापालिकेने नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या असून त्या निविदा कमी दराने गेल्याची माहिती मनपा प्रशासकांनी दिली आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने मागील 15 दिवसात 18 कामांच्या 635 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. या निविदा अंदाजपत्रकापेक्षा (Budget) कमी दराने गेल्याने स्मार्ट सिटीचे (Smart city) तब्बल 90 कोटी रुपये वाचले असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे सीईओ तथा महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. या नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांमध्ये शहरातील रस्ते, सफारी पार्कचा दुसरा आणि तिसरा टप्पा, संत तुकाराम नाट्यगृहाचे नूतनीकरण अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
अखेरच्या टप्प्यात स्मार्ट सिटीच्या कामांना वेग
स्मार्ट सिटी अभियानाला केंद्र शासनाने जून 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र या अभियानाअंतर्गत कामांच्या निविदा प्रक्रिया अंतिम करून कार्यारंभ आदेश देण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख देण्यात आली होती. त्यानुसार, स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी मागील 15 दिवसात तब्बल 635 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. या सर्वच निविदा कंत्राटदारांनी अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने दिल्या. त्यामुळे स्मार्ट सिटीचे तब्बल 90 कोटी रुपये वाचले आहेत. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत एक हजार कोटींची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने आतापर्यंत अंदाजपत्रकानुसार, सुमारे 1200 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा काढल्या आहेत. तर प्रत्यक्षात 1100 कोटींत या निविदा गेल्या आहेत.
कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान
दरम्यान, स्मार्ट सिटीने ही कामे पूर्ण करण्यासाठी नऊ महिन्यांचा अवधी दिला आहे. यापैकी 18 कामांच्या निविदा अंतिम झाल्यानंतर आता कंत्राटदारांसोबत अनामत रक्कम जमा करण्यासंबंधी चर्चा सुरु करण्यात आली असल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.
इतर बातम्या-