Nagar Panchayat Election: औरंगाबादेत सोयगाव नगर पंचायतीवर भगवा, अब्दुल सत्तारांचा दानवेंना दे धक्का!

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीसाठी अनेक पदयात्रा आणि सभा घेतल्या होत्या. परंतु शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीत बाजी मारल्याचे चित्र आहे.

Nagar Panchayat Election: औरंगाबादेत सोयगाव नगर पंचायतीवर भगवा, अब्दुल सत्तारांचा दानवेंना दे धक्का!
सोयगान नगरपंचायत निवडणुकीनंतर मंत्री अब्दुल सत्तार यांची जंगी मिरवणूक
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 6:13 PM

औरंगाबादः जिल्ह्यात सोयगाव नगर पंचायत ही एकमेव निवडणूक होती. या निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वतंत्र तसेच काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष युतीने सर्व जागांवर लढले होते. त्यामुळे या निवडणूक 17 ही वॉर्डात तिरंगी लढती झाल्या होत्या.निवडणूकित शिवसेनेचे 11 तर भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी- काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असल्याने येथे शिवसेनेची सत्ता बसणार आहे.

अब्दुल सत्तार आणि दानवेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड तसेच काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे, नामदेव पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी जी. प.अध्यक्ष रंगनाथ काळे यांनी सोयगाव निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीसाठी अनेक पदयात्रा आणि सभा घेतल्या होत्या. परंतु शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीत बाजी मारल्याचे चित्र आहे.

वॉर्डनिहाय निकाल

विजयी उमेदवार वॉर्ड क्र.1 शाहिस्ताबी राउफ,(शिवसेना), वॉर्ड क्र.2 अक्षय काळे (शिवसेना), वॉर्ड क्र.3 दीपक पगारे (शिवसेना), वॉर्ड क्र.4 हर्षल काळे, शिवसेना वॉर्ड क्र. 5 वर्षा घनघाव (भाजप), वॉर्ड क्र.6 संध्या मापारी (शिवसेना) वॉर्ड क्र.7 सविता जावळे ( भाजप) वॉर्ड क्र.8 कुसुम दुतोंडे (शिवसेना) वॉर्ड क्र.9 सुरेखा काळे (शिवसेना) वॉर्ड क्र.10 संतोष बोडखे (शिवसेना) वॉर्ड क्र.11 संदीप सुरडकर (भाजप) वॉर्ड क्र.12 भगवान जोहरे (शिवसेना) वॉर्ड क्र. 13 ममता बाई इंगळे (भाजप) वॉर्ड क्र. 14 कदिर शहा,(भाजप) वॉर्ड क्र.15 सुलताना रौफ देशमुख (भाजप) वॉर्ड- क्र 16 राजू माळी (शिवसेना) वॉर्ड क्र.17 आशाबाई तडवी-शिवसेना

मतदारांनी मागच्या वेळी सत्ता असलेल्या भाजपला दूर सारत शिवसेनेला 17 पैकी 11 जागेवर स्पष्ट बहुमत दिले आहे.तसेच भाजपला विरोधी बाकावर बसवीत काँग्रेस -राष्ट्रवादी उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकावर ठेवल्याने या निवडणुकीत भाजपला जोरदार चपराक दिली आहे.

भाजपाच्या पराभवाची कारणं काय?

स्थानिक पत्रकार भारत पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव शहरात नव्याने स्थापन झालेल्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढविली होती,त्यात भाजपला 7, शिवसेनेला 6 व काँग्रेस पक्षाला 3 जागी यश आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस खातेही उघडू शकली नव्हती. त्यावेळी निवडणुकीत सोयगाव नगर पंचायतीत भाजप व शिवसेना युती होऊन पहिला नगराध्यक्ष भाजपचा करण्यात आला होता. दरम्यान ठरल्याप्रमाणे एकदा शिवसेनेचा नगराध्यक्ष करण्यात आल्यावर भाजपने शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदावर अविश्वास ठराव आणून पून्हा नगराध्यक्षपद मिळविले होते. दरम्यामच्या काळात भाजपने मतदारांना दिलेले स्मार्ट सिटीचे आश्वासन पाळले नाही व शहरात विकास कामे केलीच नाही, त्याशिवाय शहराचा स्वच्छतेचा ठेका देखील अव्वाच्या सव्वा दराने भाजपच्या कार्यकर्त्याला देऊन कोणताही घनकचऱ्यांची विल्हेवाट लावली नाही.शहरात पाणी, वीज, आदी अडचणी सोडविल्या नाहीत त्यामुळे मतदारांनी यावेळी भाजपला आपली जागा दाखविण्याचे काम केले आहे.

प्रमुख ठरलेल्या लढती

वॉर्ड क्र. 1 मध्ये भाजपचे माजी नगराध्यक्ष कैलास काळे यांच्या पत्नी कल्पना काळे यांचा दारुण पराभव :- शिवसेनेच्या शाहिस्ताबी रउफ यांनी जोरदार मुसंडी मारली.

वॉर्ड क्र. 4 मध्ये माजी नगराध्यक्ष काळे यांचे पुतणे संदीप काळे यांचा शिवसेना उमेदवार हर्षल काळे यांच्याकडून दारुण पराभव झाला.

क्रमांक 3 मध्ये एकमेव असलेल्या एस सी राखीव वॉर्डातून निवडणूक लढविलेल्या भाजप तालुका सरचिटणीस व माजी सरपंच राहिलेल्या तसेच माजी नगर सेविकांचे वसंत बनकर यांना नवख्या असलेल्या शिवसेनेच्या दीपक पगारे कडून पराभव स्वीकारावा लागला.

वॉर्ड क्र.6 मध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेविका तसेच बांधकाम सभापती असलेल्या मनीषा संदीप चौधरी यांचा माजी स्वीकृत नगरसेवक व माजी सरपंच राजेंद्र चौधरी यांच्या पत्नी सविता चौधरी यांनी पराभव केला आहे.

वॉर्ड क्र 5 मध्ये मागच्या वेळी नगर पंचायत निवडणुजित वॉर्ड क्र.१३ मध्ये भाजप तर्फे लढवत केवळ ईश्वर चिठ्ठीने पराभूत झालेल्या व यावेळी वॉर्ड क्र ५ शिवसेनेतर्फे लढविलेले मंगेश सोहनी यांना यावेळी देखील मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवत भाजपच्या वर्षा घनगाव यांना निवडून दिले. तसेच राष्ट्रवादीच्या उमेदवार छायाबाई रवींद्र काळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान तालुकाप्रमुख प्रभाकर काळे यांच्या पत्नी सुरेखा काळे तसेच विद्यमान शहरप्रमुख संतोष बोडखे यांचा देखील विजय झाला.

इतर बातम्या-

ज्यांनी पैसे भरले त्यांची वीज तात्काळ जोडून द्या, ऊर्जामंत्र्यांचे नवे आदेश काय? वाचा सविस्तर

Sania Mirza retirement: ‘मी माझ्या तीन वर्षाच्या मुलाचा जीव…’, सानिया मिर्झाने सांगितलं रिटायरमेंट मागचं कारण…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.