औरंगाबादः सोयगाव नगरपंचायतीच्या उर्वरीत 4 जागांसाठीचे मतदान मंगळवारी होणार आहे. यापूर्वी पहिल्या 13 जागांसाठीचे मतदान पार पडले असून मंगळवारी उर्वरीत जागांसाठी मतदान होईल. या सर्व 17 जागांवरील अंतिम निकाल बुधवारी म्हणजेच 19 जानेवारी रोजी जाहीर होईल. या मतमोजणीच्या पूर्व तयारीचा आढावा नुकताच घेण्यात आला. सोयगाव बचत भवनच्या सभागृहात तीन टेबलांवर सहा फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीव मोरे यांनी दिली.
सोयगावात उर्वरीत 4 जागांसाठीचे मतदान 18 जानेवारीला पार पडल्यानंतर नागरिकांना एकूण सर्व जागांच्या अंतिम निकालाची उत्सुकता लागली आहे. पहिल्या 13 जागांसाठी भाजप-शिवसाने आघाडी आणि प्रहार असी चौरंगी लढत रंगली होती. तर आता उर्वरीत चार जागांसाठी भाजप-शिवसेना आणि आघाडी अशी तिरंगी लढत दिसून येत आहे. त्यामुळे सोयगवातल्या नागरिकांना आता चांगलीच निकालाची उत्सुकता लागली आहे.
19 जानेवारी रोजी सोयगावातील सर्व जागांवरील अंतिम निकाल जारी होतील. सोयगावच्या बचत भवन सभागृहात तीन टेबलवर सहा फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कोविड निर्बंधांचे पालन केले जावे, यासाठी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 100 पोलिसांचा बंदोबस्त केला जाणार आहे.
इतर बातम्या-