Aurangabad | औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणूकीच्या गट, गण रचनेचा आराखडा सदोष ! नव्याने रचना करण्याचे आदेश

जिल्हा निवडणूक विभागाने हा कच्चा प्रारुप आराखडा 8 मे रोजी निवडणूक विभागाकडे सादर केला होता. मात्र हा आराखडा अमान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Aurangabad | औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणूकीच्या गट, गण रचनेचा आराखडा सदोष ! नव्याने रचना करण्याचे आदेश
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 1:02 PM

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद (ZP Election) आणि पंचायत समिती गण रचनेचा निवडणूक विभागाने सादर केलेला प्रारुप आराखडा सदोष असल्याने हा आराखडा नव्याने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) जिल्हा प्रशासनाला हे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे गट, गण रचनेवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना (ZP Officials) हाताशी धरून राजकीय स्वार्थापोटी मनासारखी रचना व्हावी, यासाठी धडपड करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना चपराक बसल्याची चर्चा सुरु आहे. आता गट आणि गण रचनेचा नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे.  औरंगाबाद जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांची पंचवार्षिक मुदत 20 मार्च रोजी समाप्त झाली. जिल्हा परिषदेचेचे 8 गट आणि पंचायत समित्यांमध्ये 16 गणांची वाढ करण्याचा निर्णय मार्च महिन्यात राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची संख्या 70 तर पंचायत समित्यांमधील गणांची एकूण संख्या 140 झाली आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका

सुरुवातीला सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी भूमिका घेतली होती. औरंगाबादसह राज्यातील 25 जिल्हा परिषदा आमि 284 पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे सुद्धा वाचा

आता नव्याने आराखडा तयार होणार

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी गट आणि गण रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा अंतिम असेल, असे वाटत होते. जिल्हा निवडणूक विभागाने हा कच्चा प्रारुप आराखडा 8 मे रोजी निवडणूक विभागाकडे सादर केला होता. मात्र हा आराखडा अमान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आधी मनासारखा आराखडा तयार करण्यासाठी राजकीय नेत्यांनी केलेले प्रयत्न पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे. आता गट आणि गण रचनेचा आराखडा नव्याने तयार केल जाईल.

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.