Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | अडीच वर्षांची पोर गळ्यात फास घेऊन रडत बाहेर आली, शेजाऱ्यांच्या काळजात धस्स झालं.. घरात पाहिलं तर आजी आणि आईनं जीवन संपवलं, औरंगाबादेत काय घडलं?

दरम्यान, घटनास्थळी चार पानांची सुसाइड नोट पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. यात काय मजकूर आहे, याचा तपास पोलीस करणार आहेत. तूर्तास आत्महत्येनंतर कुणीही नातेवाईक तक्रार देण्यासाठी पुढे आला नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Aurangabad | अडीच वर्षांची पोर गळ्यात फास घेऊन रडत बाहेर आली, शेजाऱ्यांच्या काळजात धस्स झालं.. घरात पाहिलं तर आजी आणि आईनं जीवन संपवलं, औरंगाबादेत काय घडलं?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 10:14 AM

औरंगाबादः कौटुंबिक कारणातून विवाहित लेक आणि तिच्या आईने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना अत्यंत धक्कादायक पद्धतीने उघडकीस आली. माय-लेकींनी स्वतःचं जीवन संपवताना अडीच वर्षांच्या मुलीच्या गळ्यातही दोरीचा फास अडकवलेला असावा. सुदैवाने ही चिमुकली फासातून सुटली आणि गळ्यात दोरी (Rope Around neck) घेऊन तशीच रडत बाहेर आली. लहानग्या मुलीच्या गळ्यात अशाप्रकारे दोरीचा फास पाहून शेजारचे धावत आले. त्यांनी चिमुकलीच्या आई-आजीला (Grand mother and mother) आवाज देऊन पाहिल्यास आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर घरात जाऊन पाहिल्यास या मुलीची आई आणि आजीने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचं दिसून आलं. कौटुंबिक नैराश्यातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गंभीर बाब म्हणजे या दोघींच्या पतीनेही काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.

वडील व पतीचीही आत्महत्या

सिल्लोड तालुक्यातील पळशी येथे ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सुनीता भारत साबळे (47, पळशी) आणि जागृती अनिल दांगोडे (27, चिकलठाणा) अशी मृत मायलेकींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागृती लहान असताना तिच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आई सुनीता स्वतःच्या माहेरी गेल्या होत्या. मुलगी जागृती मोठी झाल्यावर तिचे लग्न झाले. तिला मुलगी झाली. पण नात दीड वर्षाची असतानाच जावयाने गेल्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर नातवाईकांनी मायलेकीला धीर देत, जागृतीचा चिकलठाणा येथे पुन्हा लग्न लावून दिले. तरीही जागृती स्वतःच्या आईला भेटण्यासाठी सिल्लोडला आली होती. यावेळी सध्या अडीच वर्षाची असलेली तिची मुलगीही सोबत होती.

शुक्रवारी काय घडलं?

जागृती माहेरी पळशी येथे आली होती. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे आजी, आई आणि नात झोपल्या होत्या. सकळी 8 वाजेच्या सुमारास चिमुकली रडतच बाहेर आली. शेजारील महिलेने हे पाहिले. घरात जाताच दोघींनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती तत्काळ सिल्लोड ग्रामीण पोलीसात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.

हे सुद्धा वाचा

चार पानांची सुसाइड नोट

दरम्यान, घटनास्थळी चार पानांची सुसाइड नोट पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. यात काय मजकूर आहे, याचा तपास पोलीस करणार आहेत. तूर्तास आत्महत्येनंतर कुणीही नातेवाईक तक्रार देण्यासाठी पुढे आला नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पण सुसाइड नोटमध्ये नेमक्या कोणत्या व्यक्तीचे नाव आहे, याविषयी आता परिसरातील नागरिकांमध्ये तर्त वितर्क लावले जात आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.