Aurangabad | याचसाठी सोसल्या कळा? बॉयफ्रेंडच्या मदतीने आईची हत्या करणारी मुलगी म्हणते, तो जेलबाहेर आला की आम्ही लग्न करू…

प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी आपल्या आईची हत्या करण्याचे धाडसच कसे झाले असावे, या विचारात असलेल्या पोलिसांना सदर अल्पवयीन मुलीने केलेले आणखी एक वक्तव्य धक्का देणारे ठरले. पतीच्या निधनानंतर दिवसभर घाम गाळून पै पै जमा करणाऱ्या आईबद्दल मुलीच्या मनातील ही संवेदनाहीन भावना पाहून, ऐकणारेही सुन्न झाले. 

Aurangabad | याचसाठी सोसल्या कळा? बॉयफ्रेंडच्या मदतीने आईची हत्या करणारी मुलगी म्हणते, तो जेलबाहेर आला की आम्ही लग्न करू...
Image Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 9:42 AM

औरंगाबादः प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आईचा प्रियकर (Boy friend) आणि मैत्रिणीच्या मदतीने काटा काढणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या (minor girl) कृत्यामुळे औरंगाबाद हादरलं (Aurangabad murder) आहे. बाळापूर शिवारातील शेतात बोलावून घेऊन मुलीने आईचा गळा चिरून खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्यामुळे औरंगाबादेत खळबळ माजली. पोलिसांनीही 12 तासांच्या आता सदर महिलेच्या खुनाचा उलगडा करीत मारेकरी बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्राला अटक केली. तसेच दोन विधीसंघर्षग्रस्त मुलींना चौकशीसाठी नेत बालसुधारगृहात पाठवण्यात आले. पोलिसांची चौकशी सुरु असताना सदर मुलीने केलेल्या वक्तव्यानंतर तर पोलीस अधिकाऱ्यांच्याही पायाखालची जमीन हादरली. प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी आपल्या आईची हत्या करण्याचे धाडसच कसे झाले असावे, या विचारात असलेल्या पोलिसांना सदर अल्पवयीन मुलीने केलेले आणखी एक वक्तव्य धक्का देणारे ठरले. पतीच्या निधनानंतर दिवसभर घाम गाळून पै पै जमा करणाऱ्या आईबद्दल मुलीच्या मनातील ही संवेदनाहीन भावना पाहून, ऐकणारेही सुन्न झाले.

मारेकरी अल्पवयीन मुलीचे वक्तव्य काय?

आईची हत्या करून आलेल्या मुलेल्या मुलीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिला विचारले, तू जे केलेस त्याचे परिणाम माहिती आहेत का? यावर उत्तर देताना मुलीने म्हटले, ‘त्यात काय एवढे? तो तुरुंगातून बाहेर आल्यावर आम्ही लग्न करू’.. मुलीचे हे वक्तव्य ऐकून पोलिसांना धक्काच बसला.

काय घडली नेमकी घटना?

सोमवारी आठ वाजता बाळापूर शिवारात सुशीला संजय पवार (39) या महिलेचा मृतदेह आढळला. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्यासह सायबर पोलिसांनी तपास केला. त्यात समोर आलेली माहिती अशी की, पतीच्या निधनानंतर सुशीला दोन मुले आणि एकुलत्या एक लेकीसोबत शिवाजीनगरात हातगाडीवर भाजीपाला विक्री करत होत्या. अल्पवयीन मुलीच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळाल्यावर आईने मुलगी आणि तिच्या प्रियकराची कानउघडणी केली होती. याचाच राह मनात धरून मुलीने मदर्स डेच्या पूर्वसंध्येलाच बॉयफ्रेंडला हाताशी धरून आईचा गळा कापला. रविवारी रात्री 11 वाजता त्यांना मुलीने फोन करून बाळापूर शिवारात बोलावून घेतले. या 12 वर्षाच्या मुलीने साथीदारांच्या मदतीने आईचा खून केला. त्यानंतर आईचीच गाडी घेऊन चौघे निघून गेले. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी 12 तासांच्या आतच या खुनाचा छडा लावला. सुशीला यांचा खून करण्याची योजना चार दिवसांपूर्वीच आखली असल्याची आरोपींनी सांगितलं. प्रियकर दीपक बचाटे (24) आणि त्याचा मित्र सुनील मेहर तसेच सदर मुलगी व तिची मैत्रीण या चौघांनी हा भयंकर प्रकार केला. दीपक आणि सुनीलला न्यायालयाने 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर आईच्या हत्येचा कट रचणारी मुलगी व तिच्या मैत्रिणीची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.