Aurangabad Shivjayanti | सस्पेन्स संपलं, औरंगाबादच्या शिवरायांच्या पुतळ्याचं 18 फेब्रुवारीला मध्यरात्री अनावरण

देशातील सर्वाधिक उंचीचा शिवछत्रपतींचा अश्वारुढ पुतळा औरंगाबादेत शहराच्या मध्यवर्ती क्रांती चौकात स्थापित करण्यात आला आहे. पुण्यातील शिल्पकार दीपक थोपटे यांनी हे शिल्प घडवले आहे तर पुतळ्याभोवतीच्या चबुतरा आणि परिसराचे सौंदर्यीकरण धीरज देशमुख यांनी केले आहे.

Aurangabad Shivjayanti | सस्पेन्स संपलं, औरंगाबादच्या शिवरायांच्या पुतळ्याचं 18 फेब्रुवारीला मध्यरात्री अनावरण
औरंगाबाद येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा शिवप्रेमी करत आहेत.
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 9:42 AM

औरंगाबाद | देशातला सर्वोच्च असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) औरंगाबादेत येऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत. आता शिवजयंतीदेखील तोंडावर आली. पण पुतळ्याचे अनावरण कधी करणार, हा प्रश्न कित्येक दिवसांपासून प्रलंबित होता. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या (ShivJayanti) मुहूर्तावर पुतळ्याचे अनावरण होते का, असे वाटत होते. तर पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आता फार प्रतीक्षा करू शकत नाही, असे म्हणत 18 फेब्रुवारीची अंतिम मुदत देणाराही एक गट होता. महापालिकेला पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त सापडत नसेल तर आम्ही 18 फेब्रुवारी रोजी शिवरायांच्या पुतळ्याचे (Aurangabad Shivaji Maharaj Statue) अनावरण करू, असा इशारा शिवराय प्रेमींनी दिला होता. अखेर या प्रश्नाचं सस्पेन्स संपलं असून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 18 फेब्रुवारीला मध्यरात्री हा सोहळा होईल, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला.

कुणाच्या हस्ते होणार लोकार्पण?

शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाची तारीख मंगळवारी मुंबईहूनच जाहीर करण्यात आली. 18 फेब्रुवारीला मध्यरात्री हा सोहळा होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन हजेरी लावणार आहेत तर शहरात प्रत्यक्ष रित्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई हे उपस्थित राहणार आहेत. 23 जानेवारीला औरंगाबादेत छत्रपतींचा पुतळा आणण्यात आला. मात्र त्याचं अनावरण कधी होणार हे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत नव्हतं. अखेर हा सस्पेन्स संपला आहे.

मध्यरात्रीच्या मुहूर्तावरून तीव्र प्रतिक्रिया

दरम्यान, औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने पुतळ्याचा अनावरण सोहळा 18 फेब्रुवारीला सायंकाळी किंवा शिवजयंतीच्या दिवशी सकाळी करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने मध्यरात्रीचा मुहूर्त निवडल्यामुळे उत्सव समिती, शिवप्रेमी जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण भरपूर जल्लोषात, ढोल-ताशांच्या गजरात करण्याची शिवप्रेमींची इच्छा होती. मात्र मध्यरात्रीच्या मुहूर्तामुळे यावर बंधनं येऊ शकतात. आता यासाठी विशेष परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

देशातला सर्वोच्च शिवरायांचा पुतळा

देशातील सर्वाधिक उंचीचा शिवछत्रपतींचा अश्वारुढ पुतळा औरंगाबादेत शहराच्या मध्यवर्ती क्रांती चौकात स्थापित करण्यात आला आहे. पुण्यातील शिल्पकार दीपक थोपटे यांनी हे शिल्प घडवले आहे तर पुतळ्याभोवतीच्या चबुतरा आणि परिसराचे सौंदर्यीकरण धीरज देशमुख यांनी केले आहे.

इतर बातम्या-

कंटेनर गेटला घासत नाही ना? ड्रायव्हर उतरताच गाडी अचानक पुढे, गेटमध्ये अडकून जागीच मृत्यू

Bappi Lahiri | तम्मा तम्मा ते तुने मारी एन्ट्रिया, डिस्को किंग बप्पी लाहिरींची सुपरहिट गाणी!

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.