औरंगाबाद : भाड्याने कार (Car on Rent) घ्यायच्या आणि त्या परस्पर गहाण टाकायच्या… असा नवाच उद्योग एका तरुणानं सुरु केल्याचा विचित्र प्रकार औरंगाबादमध्ये (Aurangabad) समोर आला आहे. अशा पद्धतीने या तरुणाने तीन कार वेगवेगळ्या व्यक्तींकडे गहाण ठेवल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मित्राच्या मदतीने त्याचा हा धंदा सुरु असल्याचे बोलले जात आहेत. या प्रकरणी औरंगाबादमधील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात (Police station) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणातील दोन आरोपींचा शोध घेत आहेत.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भगवान वाल्मिक देशमुख आणि विनोद दामोदर अरबट या दोन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे दोघेही पुंडलिक नगरमधील राहणारे आहेत. प्रमोद सोपान टेकाळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. टेकाळे यांचा एसएस टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या मित्र भरत श्रीखंडे यांच्या मार्फत टेकाळे यांची आरोपी भगवान देशमुख याच्याशी ओळख झाली. त्याने तीन कार भाडेतत्त्वावर घेण्याबाबत बोलणी केली. त्यानंतर टेकाळे यांच्या मदतीने तीन कार भाडे करारनामा करून देण्यात आल्या. त्याचे 22 हजार, 16 हजार आणि 17 हजार असे तिघांना देण्याचे ठरले. त्यावर प्रति महिना किरायाचे पैसे देणे अपेक्षित होते. मात्र देशमुखने किरायाचे पैसे तर दिलेच नाहीत. उलट या तिन्ही कार अन्य व्यक्तींकडे गहाण ठेवल्या.
या कारच्या किरायाचे पैसे देण्याऐवजी भगवान देशमुख यांनी या तीनही कार इतर व्यक्तींकडे दहाण ठेवल्याची माहिती समोर आली. दरम्यान एका व्यक्तीने त्याची गहाण ठेवलेली कार सोडवून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी भगवान देशमुख याने अशा प्रकारे अनेकांची फसणवूक केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेषगाव खटाणे करीत आहेत.
इतर बातम्या-