Children Vaccination: औरंगाबाद जिल्ह्यात 6,194 किशोरवयीनांचे लसीकरण, शहरातही उत्तम प्रतिसाद
पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 6,194 किशोरवयीन मुले आणि मुलींनी ही लस घेतली. तर जिल्ह्यात 1,068 विद्यार्थ्यांनी लस घेतली. पहिल्याच दिवशी विविध लसीकरण केंद्रांवर विद्यार्थ्यांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.
औरंगाबादः शाळा, कॉलेज सुरु होऊनही मुलांचे लसीकरण (Children Vaccination) कधी सुरु होतेय, याची वाट पालक पहात होते. काल अखेर 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीनांचे लसीकरण सुरु झाले. औरंगाबादमध्ये या ग्रुपमधील मुलांना लसीकरणासाठी शहरात चार तर जिल्ह्यात दहा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. काल पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 6,194 किशोरवयीन मुले आणि मुलींनी ही लस घेतली. तर जिल्ह्यात 1,068 विद्यार्थ्यांनी लस घेतली. पहिल्याच दिवशी विविध लसीकरण केंद्रांवर विद्यार्थ्यांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. प्रौढांच्या तुलनेत लहान असल्यामुळे लस घेताना मुलांना होणाऱ्या वेदना जाणवत होत्या, मात्र आयुष्यभराच्या सुरक्षिततेसाठी त्यांनीही वेदना सहन करण्याचे ठरवले होते, असेच दिसून आले.
जिल्ह्यात 2 लाख, 13 हजारांचे उद्दिष्ट
औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे 2 लाख 13 हजार 823 एवढी मुले किशोरवयीन गटात मोडतात. तर शहरातील ही संख्या 69,998 एवढी आहे. शहरातील 59 केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील सहा ठिकाणी कोव्हॅक्सिन तर 43 ठिकाणी कोविशील्ड लस देण्यात येत आहे. दहा सेंटरवर रात्री 10 वाजेपर्यंत लसीकरणाची सोय असेल. लसीकरणासंबंधी काही शंका असल्यास हेल्पलाइन क्रमांकही देण्यात आला आहे. 9856306007 या क्रमांकावर फोन करून नागरिक शंका विचारू शकतात, असे आवाहन मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले.
किशोरवयीनांसाठीची सहा लसीकरण केंद्र कोणती?
एसबीओ शाळा अंबिकानगर आरोग्य केंद्र मेल्ट्रॉन हॉस्पिटल प्रियदर्शनी विद्यालय राजनगर आरोग्य केंद्र क्रांती चौक आरोग्य केंद्र
जिल्ह्यात सोमवारी किती कोरोना रुग्ण?
औरंगाबाद जिल्ह्यात सोमावरी दिवसभरात 37 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात शहरातील 29 तर ग्रामीण भागातील 8 रुग्णांचा समावेश आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रातून शुभारंभ लसीकरणामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याने कोरोना संक्रमणाला अटकाव होणार@DMAurangabadMH pic.twitter.com/vyDSoFy6gJ
— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) January 3, 2022
इतर बातम्या-