एकल महिलेला लग्नाचं आमिष, गर्भवती झाल्यावर जीवे मारण्याची धमकी, औरंगाबादचा वर्दीतला हा नराधम कोण?
पीडित महिला आरोपी पोलिसाच्या घरी पैसे मागण्यासाठी घरी गेली असता, तिने पोलिसाच्या पत्नीला घरात घुसून मारहाण केल्याचा गुन्हा सिडको पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. 3 फेब्रुवारीची ही घटना आहे. त्यानंतर सदर पोलिस शिपायावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद: लग्नानंतर पतीशी पटत नसल्याने विभक्त राहणाऱ्या विवाहित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याची घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. गंभीर बाब म्हणजे एका पोलीस शिपायानेच हा अत्याचार (sexually abused ) केला. सुरुवातीला लग्नाचे अमिष, तुला दोन मुलांसोबत स्वीकारतो, असे सांगणाऱ्या या पोलिसाने तब्बल वर्षभर हे प्रकरण सुरु ठेवलं. सदर महिला सहा आठवड्यांची गर्भवती (Woman Rape) राहिल्यानंतर तिने लग्नाची मागणी केली. मात्र त्यानंतर गर्भपात कर नाही तर तुला पोरा-बाळांसकट मारुन टाकेन अशी धमकी त्याने दिली. अखेर खासगी रुग्णालयात तिचा गर्भपातही केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर महिलेने पोलिसांकडे (Aurangabad police) तक्रार दाखल केली.
काय आहे सविस्तर माहिती?
याविषयी सविस्तर माहिती अशी की, संदीप लक्ष्मण पवार असे आरोपी शिपायाचे नाव आहे. छावणी पोलीस स्टेशनमध्या सदर प्रकरणाची नोंद झाली असून फिर्यादीनुसार, पीडिता ही नवफ्यासोबत वाद झाल्यामुळे विभक्त राहते. तिला दोन मुले आहेत. 2021 मध्ये ती एका मॉलमध्ये कामाला असताना त्याठिकाणी शिपाई संदीप कामानिमित्त गेला होता. त्यावेळी दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यावरून पवारने तिला दोन मुलांसह स्वीकारून लग्नाचे आमिष दाखवले. तसेच 15 फेब्रुवारी 2021 ते 29 जानेवारी 2022 दरम्यान जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले. लग्नासाठी मागणी केल्यानंतर त्याने टाळाटाळ करायला सुरुवात केली.
आठ ते दहा लाखही उकळले
लग्नाचे केवळ आमिष दाखवून या पोलीस शिपायाने सदर महिलेकडून आठ ते दहा लाख रुपयेदेखील घेतली. 28 ऑगस्ट 2021 रोजी सहा आठवड्यांची गर्भवती असल्याचे सोनोग्राफी केल्यानंतर स्पष्ट झाले. तेव्हा पोलिसाने गर्भपात करण्याचा आग्रह धरला गेला. गर्भपात कर नाही तर तुझ्या मुलांना मारून टाकेन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात करून घेतला. माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तू माझे काहीही वाकडे करु शकणार नाहीस, असे म्हणत त्याने अत्याचार सुरुच ठेवले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाच्या विरोधात छावणी ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडितेवरही मारहाणीचा गुन्हा
दरम्यान, पीडित महिला आरोपी पोलिसाच्या घरी पैसे मागण्यासाठी घरी गेली असता, तिने पोलिसाच्या पत्नीला घरात घुसून मारहाण केल्याचा गुन्हा सिडको पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. 3 फेब्रुवारीची ही घटना आहे. त्यानंतर सदर पोलिस शिपायावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या-