Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather: औरंगाबादचा पारा घसरतोय, आरोग्य सांभाळा, वाचा कधी होती सर्वाधिक थंडी?

20 ऑक्टोबरला 17.0 इथपर्यंत तापमानात घट झाली. 23 ऑक्टोबरला औरंगाबादचे तापमान किमान तापमान 15 अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले. नोव्हेंबर महिन्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Weather: औरंगाबादचा पारा घसरतोय, आरोग्य सांभाळा, वाचा कधी होती सर्वाधिक थंडी?
हिवाळ्यात रुक्ष त्वचा टाळण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 5:25 PM

औरंगाबादः मागील आठवड्यापासून औरंगाबाद शहरात हलक्या थंडीची लाट (Winter in Aurangabad) पसरली आहे. आरोग्य वाढीच्या दृष्टीने हिवाळा जेवढा महत्त्वाचा असतो, तितकाच आरोग्य बिघाड होऊ नये, यासाठीदेखील हिवाळ्यात काळजी गरजेचे असते. त्यामुळे हिवाळा येताच प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीनुसार आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.

औरंगबादामधील घसरते तापमान

मागील आठवड्यापासून औरंगाबादमधील तापमानात हळू हळू घट होण्यास सुरुवात झाली. 18 ऑक्टोबर रोजी औरंगाबादचे किमान तापमान 21.2 अंश सेल्सियस एवढे होते. 19 ऑक्टोबर रोजी औरंगाबादचे तापमान 19.1 अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले. तर 20 ऑक्टोबरला 17.0 इथपर्यंत तापमानात घट झाली. 23 ऑक्टोबरला औरंगाबादचे तापमान किमान तापमान 15 अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले.

जास्त उष्मांकाचे पदार्थ सेवन करावे

हिवाळ्याच्या दिवसात बाहेरील तापमान कमी होते, त्यामुळे या तापमानाशी संतुलन साधण्यासाठी आपल्याला जास्त उष्मांक असलेले अन्नपदार्थ सेवन करणे गरजेचे आहे. यात बाजरी, सुका मेवा, दूध आणि दुधाचे पदार्थ असे उत्तम प्रतीची प्रथिने असलेले अन्न सेवन केले पाहिजे. दिवाळीत तयार करण्यात येणारे पदार्थदेखील याच दृष्टीने तयार केले जातात, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील आहारतज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी म्हणाल्या.

शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवावे

थंडीला सुरुवात झाल्यावर बदललेल्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी-खोकल्यासह संसर्गजन्य आजारांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. हिवाळ्यात त्वचा रुक्ष होते. तसेच शरीरातील तेलकटपणा कमी होऊन त्वचेला भेगा पडणे, ओठ फुटण्यालाही सामोरे जावे लागते. वातावरणात थंडी असल्याने पाणी पिण्याचे टाळले जाते. त्यामुळेच शरीराची त्वचा आणखी कोरडी होऊ लागते. त्यामुळे नागरिकांनी थंड पाणी पिणे जमत नसेल तर कोमट पाणी पिणे गरजेचे आहे.

सर्वाधिक पारा कधी घसरला?

औरंगाबादेत 1952 या वर्षी 30 ऑक्टोबर रोजी सर्वाधिक थंडीची लाट आली होती. या दिवशी शहरात 8.3 एवढे किमान तापमान नोंदवले गेले होते. शहरात शुक्रवारी 15.0 अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली. मागील दोन वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील हे सर्वात कमी तापमान ठरले.

राज्यात नाशिकनंतर औरंगाबाद सर्वात थंड

राज्यात नाशिकचे किमान तापमान सरासरीपेक्षा 4 अंशांनी कमी होऊन 14.8 वर सर्वात कमी नोंदवले गेले. त्यानंतर महाबळेश्वर व औरंगाबादमध्ये 15, नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी 15.5, यवतमाळ 16, मालेगाव, जळगाव 16.6 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले. उर्वरीत शहराचे तापमान 17 ते 24 अंश सेल्सियस असल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे.

इतर बातम्या-

Nagpur | नागपुरात गुलाबी थंडीची चाहूल, तापमान घसरले

हिवाळी अधिवेशन : 2 डोस घेतले तरी RTPCR अनिवार्य, आमदारांच्या PA ला प्रवेश नाही, प्रेक्षकांना नो एन्ट्री!

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....