औरंगाबाद: वाळूजच्या चकचकीत मल्टिप्लेक्सचा श्रीगणेशा, येत्या 5 नोव्हेंबरला ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पडदा उघडणार

औरंगाबादः 22 ऑक्टोबरपासून राज्यभरातील चित्रपटगृहे (Cinema Hall) पुन्हा एकदा खुली होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सिनेमागृह चालकांनी जय्यत तयारीही सुरु केली आहे. औरंगाबाद शहरातील वाळूज परिसरातील भव्य खिवंसरा मल्टिप्लेक्सनेही (Khivansara Multiplex ) यासाठी तयारी सुरु केली आहे. वाळूज परिसरात 2020 पासून प्रेक्षकांसाठी उभारण्यात आलेले आकर्षक इमारतीचे खिवंसरा मल्टिप्लेक्स (waluj talkies अनेक दिवसांपासून नागरिकांचे लक्ष […]

औरंगाबाद: वाळूजच्या चकचकीत मल्टिप्लेक्सचा  श्रीगणेशा, येत्या 5 नोव्हेंबरला 'सूर्यवंशी' चित्रपटाने पडदा उघडणार
वाळूज येथील खिवंसरा मल्टिप्लेक्सचा लवकरच शुभारंभ
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 11:08 AM

औरंगाबादः 22 ऑक्टोबरपासून राज्यभरातील चित्रपटगृहे (Cinema Hall) पुन्हा एकदा खुली होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सिनेमागृह चालकांनी जय्यत तयारीही सुरु केली आहे. औरंगाबाद शहरातील वाळूज परिसरातील भव्य खिवंसरा मल्टिप्लेक्सनेही (Khivansara Multiplex ) यासाठी तयारी सुरु केली आहे. वाळूज परिसरात 2020 पासून प्रेक्षकांसाठी उभारण्यात आलेले आकर्षक इमारतीचे खिवंसरा मल्टिप्लेक्स (waluj talkies अनेक दिवसांपासून नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. मात्र अचानक लॉकडाऊन लागल्याने तेव्हापासून ही इमारत बंद होती. आता मात्र 5 नोव्हेंबर रोजी या चकचकीत मल्टिप्लेक्सचा शुभारंभ होणार असल्याची माहिती चित्रपट मालकांनी दिली आहे.

वाळूज परिसरातील सिनेरसिकांची सोय

खिंवसरा मल्टिप्लेक्सचे सर्वेसर्वा रवींद्र खिंवसरा यांनी सांगितले की, शहरातील अंबा आणि अप्सरा चित्रपटगृहे आम्ही 2008 पासून चालवत आहोत. वाळूज-पंढरपूर भागात अद्ययावत सिनेमागृह असावे, अशी तेथील नागरिकांची मागणी होती. औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात किमान साडेतीन लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. मात्र या भागात एकही चित्रपटगृह नसल्याने आतापर्यंत तेथील सिनेरसिकांना मनोरंजनासाठी 12 किमी प्रवास करून शहरात यावे लागत होते. या नागरिकांच्या मागणीचा विचार करून आम्ही 2011 मध्ये चित्रपटगृह उभारण्याचा विचार केला. त्यानंतर जागा, इतर परवानग्या आणि उभारणी पूर्ण होण्यासाठी 2020 साल उजाडले. मार्च 2020 मध्येच चित्रपटगृह कार्यान्वित करण्याचा आमचा मानस होता. पण, कोरोनामुळे हा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. शासनाचे बंधन आल्याने आम्हाला चित्रपटगृह सुरू करण्याची संधीच मिळाली नाही. आता 5 नोव्हेंबरपासून हे सिनेमागृह सुरू होईल.

नव्या मल्टिप्लेक्सला 4 स्क्रीन

वाळूजच्या मोरे चौकाच्या मुख्य रस्त्यावर खिंवसरा मल्टिप्लेक्स उभारण्यात आले. या ठिकाणी 4 स्क्रीन आहेत. प्रत्येक स्क्रीनची आसन क्षमता 80 आहे. एकूण 320 रसिक एकावेळी चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील. लॉकडाऊनमध्ये बंद असलेली चित्रपटगृहे 22 ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. त्या दृष्टीने शहरातील सर्व सिनेमागृहे चालकांनी तयारी सुरू केली आहे. मात्र बहुतांश चित्रपटगृहे 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पडदा उघडणार आहेत. आता अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले व वाळूज भागात नव्याने उभारलेले खिंवसरा मल्टिप्लेक्सही 5 नोव्हेंबरपासूनच सुरू होणार असल्याने या भागातील सिनेशौकिनांची सोय होणार आहे.

सिनेरसिकांचे लक्ष मोठ्या पडद्याकडे

2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटानंतर कोरोनाचे संकट उद‌्भवले. त्यामुळे नंतर एकही नवा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. अनलॉकनंतर गेल्या वर्षी 13 नोव्हेंबर 2020 ला चित्रपटगृहे खुली करण्यात आली. मात्र, कोरोना संपलेला नव्हता, त्यामुळे निम्म्या आसन क्षमतेवरच परवानगी देण्यात आली. त्यामुळे वितरकांनी नवे चित्रपट प्रदर्शित केले नाहीत. आता 1983 च्या वर्ल्ड कपवर आधारित रणवीरसिंहचा ‘83 ‘, रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी ‘, कंगना रनौतचा ‘थलायवी’ हे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. त्यामुळे चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनांत उत्साहाचे वातावरण आहे. शिवाय गेले 19 महिने चित्रपटगृहापासून लांब असलेला रसिकही मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे.

इतर बातम्या-

Marathi Movie | अनलॉकनंतर मनोरंजनाची नांदी, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट ‘जयंती’!

पेटीएमची सणासुदीच्या काळात उत्तम कॅशबॅक ऑफर, 1 लाख जिंकण्याची संधी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.