Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangzeb : दिल्लीचं तख्त ते नगरची माती.., शहेनशाहा औरंगजेबाची नगरच्या मातीत कशी झाली अखेर? कसा जगला हा क्रूर बादशाहा शेवटची वर्षे

26 वर्ष म्हणजे 1681 ते 1707 म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत तो इथंच राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1680 साली देह ठेवला आणि त्याच्यानंतर वर्षभराने औरंगजेब मराठेशाहीचा अस्त करण्याच्या इच्छेने दक्षिणेत आला होता.

Aurangzeb : दिल्लीचं तख्त ते नगरची माती.., शहेनशाहा औरंगजेबाची नगरच्या मातीत कशी झाली अखेर? कसा जगला हा क्रूर बादशाहा शेवटची वर्षे
दिल्लीचं तख्त ते नगरची माती.., शहेनशाहा औरंगजेबाची नगरच्या मातीत कशी झाली अखेर? कसा जगला हा क्रूर बादशाहा शेवटची वर्षेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 9:58 PM

औरंगाबाद : अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीपुढं झुकले, आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं. ज्या औरंगजेबाने महाराष्ट्रावरच नाही तर उभ्या भारतावर इतके अत्याचार केले, ज्याने शंभूराजांचा (Chatrapati Sambhaji Maharaj) क्रूरपणे त्रास दिला, त्याच्या गौरव कशासाठी असा प्रश्न आता उभ्या महाराष्ट्रातून विचारला जाऊ लागला आहे, आणि इथंच इतिहासाच्या कबरीतला मुडदा पुन्हा उभा राहिलाय. त्याचं नाव औरंगजेब. खरंतर औरंगजेबाची कबर खुल्ताबादला आहे, आणि इथंच त्याचा मृत्यू झाला असं अनेकांना वाटत असेल. पण तसं नाहीय. औरंगाबादला जरी औरंगजेबाची कबर असली, तरी तो ज्या मातीत संपला, ती माती होती नगरची…अहमदनगरची..अहमदनगरपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भिंगारजवळ एक गाव आहे, त्याचं नाव आलमगीर. आलमगीरचा अर्थ होतो जगाचा देव. आणि हीच पदवी औरंगजेबाला देण्यात आली होती. त्याला आलमगीरच म्हटलं जायचं.

काय आहे नगरच्या आलमगीरचा इतिहास ?

औरंगजैबाच्या नावावरच या गावाला हे नाव मिळालं. या गावात आजही ती जागा आहे, जिथं मुघल साम्राज्याचा बादशाह, दिल्लीचा सम्राट मराठ्यांना वेसण घालण्यासाठी महाराष्ट्रात आला आणि तब्बल 28 वर्ष अडकून पडला, त्याला त्याच्या हयातीतही मराठेशाही संपवता आली नाही, हे विशेष. आणि याच महाराष्ट्राच्या मातीत त्याची अखेर झाली. मराठ्यांनी औरंगजेबाला इतकं पिसाटून सोडलं होतं की त्याला जळी- स्थळी केवळ मराठेच दिसत असत. त्यावेळी आपला राज्यकारभार चालवण्यासाठी औरंगजेबानं जी जागा निवडली, ती हीच आलमगीरची जागा होती. 26 वर्ष म्हणजे 1681 ते 1707 म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत तो इथंच राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1680 साली देह ठेवला आणि त्याच्यानंतर वर्षभराने औरंगजेब मराठेशाहीचा अस्त करण्याच्या इच्छेने दक्षिणेत आला होता.

कसं पडलं औरंगाबादचं नाव ?

औरंगाबादचं खरं नाव खडकी, मलिक अंबरने खडकीचा विकास केला. मलिक अंबरने पुढे या शहराचं नाव बदललं, आणि आपल्या मुलाच्या नावावरुन शहराचं नाव झालं फतेहपूर. पण 1653 साली औरंगजेब दक्षिणेत आला आणि त्याने या शहराचं नाव केलं, औरंगाबाद. मुस्लिम संस्कृतीचा विकास सुरु झाला, सुफी संतांचा परंपराही भरभराटीस आली. औरंगाबाद सांस्कृतिक केंद्र बनलं. 1653 नंतर औरंगजेब बादशाह झाला खरा, पण त्यानंतर त्याच्या आय़ुष्यात फारकाळ सुख राहिलं नाही. त्याचा शेवटचा काळ हा नैराश्यातच गेला. 26 वर्ष वाया घालवूनही काही न मिळाल्याने तो निराश झाला, आणि त्याच्या मुलासमोर म्हणाला, मी एकटाच जन्मलो, एकटाच मरणार.

हे सुद्धा वाचा

नगरमधून हाकत होता देशाचा कारभार

औरंगजेब हा शेवटच्या काळात अहमदनगरला आलमगीर या ठिकाणी राहायला आला. जिथं तो अगदी साधं आयुष्य जगत होता. इथंच त्याने कुराणाची प्रतही स्वताच्या हाताने लिहली, त्याने लिहलेलं हे कुराण आजही आलमगीरमध्ये जतन करुन ठेवण्यात आलं आहे. इथं असलेल्या बारदारीत दरबार भरत होता, जिथं बसून तो उभ्या मुघल साम्राज्याला आदेश देत असे. सगळ्या हिंदुस्तानच्या साम्राज्याचा गाडा नगर जिल्ह्यातील आलमगीर इथून हाकला जात होता. औरंगजेबच्या शेवटच्या काळात त्याने केलेल्या प्रत्येक पापाची फेड करावी लागत होती. नियतीने बादशाहला फकीर बनवलं. औरंगजेबाचा अखेर इथंच मृत्यू झाला. औरंगजेब मेला तेव्हा त्याच्याजवळ फक्त 300 रुपये होते. 300 रुपयांची रक्कम जरी त्यावेळी खूप मोठी वाटत असली, तरी एका बादशाहच्या मानाने ती दमडीही नव्हती.

गुरुच्या बाजूला औरंगजैबाची कबर

आलमगीरच्या चौथऱ्यावर औरंगजेबाला शेवटची आंघोळ घालती गेली. त्याचं काळीज काढून इथंच गाडल्याचा दावा स्थानिक करतात. मृत्यूनंतर आपल्याला आपल्या गुरुच्या बाजूला स्थान मिळावं, अशी औरंगजेबाची इच्छा होती, त्याच इच्छेवरुन त्याला त्याचे गुरु शेख झैमुद्दीन या सुफी संतांच्या बाजूला गाडण्यात आलं. त्यासाठी त्याचं पार्थिव अहमदनगरहून औरंगाबादच्या खुलताबाद इथं नेण्यात आलं आणि त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यात आली. अकबरुद्दीन ओवैसी जिथं गेले होते, तीच खुलताबादमधली ही जागा. आता ज्या जागी ओवैसींसह जलील यांनी मान झुकवल्याने वाद निर्माण झाला आहे.

इतिहास माफ करत नाही

औरंगजेब जाऊन जवळपास 300 वर्षांहून अधिक काळ लोटला. पण, औरंजेबाने केलेल्या अत्याचारामुळे, त्यांच्या अत्याचाराच्या आठवणींची कबर वारंवार खोदली जाते. त्यातून औरंगजेबाला वारंवार बाहेर काढलं जातं आणि त्याला परत कबरेत लोटलं जातं. इतिहास कधी कुणाला माफ करत नाही, इसं म्हणतात.. मग तो अत्याचाराची सीमा परिसीमा गाठणारा औरंगजेब असो, वा त्याच्या कबरीपुढे झुकणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या माना असोत.

गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण....
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण.....
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर.
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य.
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल.
गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हाव
गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हाव.
''ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला' उदयनराजे पुन्हा भडकले
''ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला' उदयनराजे पुन्हा भडकले.
600 मीटरचा रस्ता अन् अजितदादा - सुप्रियाताईंचं शाब्दिक युद्ध
600 मीटरचा रस्ता अन् अजितदादा - सुप्रियाताईंचं शाब्दिक युद्ध.
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील.
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत.
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली.