मलकापूर बँकेवर निर्बंध, औरंगाबादेत 40 हजार खातेधारकांना धडकी, काय आहे प्रकरण?

औरंगाबादः मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Malakapur Bank) व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने (RBI) निर्बंध घातल्याने शहरातील या बँकेच्या खातेधारकांची चिंता वाढली आहे. बँकेच्या औरंगाबादमध्ये सात शाखा असून त्यात एकूण 40 नागरिकांची खाती आहेत. ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचा दावा बँकेने केला आहे, मात्र पुढील सहा महिन्यांपर्यंत रिझर्व्ह बँकेने विविध प्रकारचे निर्बंध घातल्याने पहिल्याच दिवशी अनेकांनी मर्यादित रकमेएवढे म्हणजे […]

मलकापूर बँकेवर निर्बंध, औरंगाबादेत 40 हजार खातेधारकांना धडकी, काय आहे प्रकरण?
पीएनबीच्या ग्राहकांना अलर्ट: बँक सेवा शुल्कात बदल
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 2:10 PM

औरंगाबादः मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Malakapur Bank) व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने (RBI) निर्बंध घातल्याने शहरातील या बँकेच्या खातेधारकांची चिंता वाढली आहे. बँकेच्या औरंगाबादमध्ये सात शाखा असून त्यात एकूण 40 नागरिकांची खाती आहेत. ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचा दावा बँकेने केला आहे, मात्र पुढील सहा महिन्यांपर्यंत रिझर्व्ह बँकेने विविध प्रकारचे निर्बंध घातल्याने पहिल्याच दिवशी अनेकांनी मर्यादित रकमेएवढे म्हणजे 10 हजार रुपये काढून घेतले. यामुळे बँकेच्या शहरातील विविध शाखांवर काल दिवसभर खातेधारकांची झुंबड उडाली होती.

RBI ने का घातले निर्बंध?

बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचे दिसून आल्यानंतर आरबीआयने मलकापूर बँकेवर बुधवारी 24 नोव्हेंबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या परवानगी शिवाय जुन्या कर्जाचे नूतनीकरण, नवीन ठेवी स्वीकारता येणार नाही. मात्र खातेधारकांचे व्यवहार सुरु ठेवता येतील, असे आरबीआयच्या आदेशात म्हटले आहे. कोरोनामुळे वसुली थकली आणि एनपीए 20 टक्क्यांच्या पुढे गेल्याने RBI ने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

वाचा सहा महिन्यांसाठी कोणते निर्बंध?

– चालू, बचत खात्यातून येत्या सहा महिन्यात एका वेळी फक्त 10 हजार रुपये काढता येतील. – चेक क्लिअरिंग बंद, चेक इनवर्ड, आऊटवर्ड किंवा पास होणार नाही. – चेक क्लिअरिंगला जाणार नसल्याने समोरच्या व्यक्तीला तो मिळणार नाही. त्यामुळे बाऊन्सचा दंड टळेल. – एटीएम बुधवारपासून बंद. – पे ऑर्डर, आरटीजीएस, एनईएफटी होणार नाही. – लॉकरवर निर्बंध नाहीत. तरीही त्यातून दागिने काढून घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. – आरबीआयच्या नियमाप्रमाणे 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे विमा कवच देणे बंधनकारक आहेय त्यामुळे पाच लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

1997 मध्ये पहिली शाखा

मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची पहिली शाखा शहरातील गुलमंडी येथे सुरु झाली. सध्या शरातील सात शाखांमध्ये सुमारे 40 हजारांहून अधिक खाती आहेत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील 28 शाखांत एक हजार कोटींहून अधिकच्या ठेवी आहेत. सर्व शाखांमध्ये चेक क्लिअरिंह सेंटरही आहे. मात्र बँकेने अद्याप ऑनलाइन बँकिंग अॅप किंवा युपीआय सुविदा दिलेल्या नाहीत.

इतर बातम्या-

देवेंद्र फडणवीसांनी ज्यांना डावललं त्यांना पुन्हा संधी; भाजपमध्ये नेमकं काय चाललंय?

शेअर बाजारात घसरण; चालू आठवड्यात कोट्यावधीचे नुकसान, आयटी क्षेत्रात गुंतवणुकीचा तज्ज्ञांकडून सल्ला

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.