Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत ओबीसी मेळाव्याचे बॅनर फाडले, द्वेष भावनेतून बॅनर फाडल्याचा संशय, भाजपमध्ये संताप

औरंगाबाद: भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा ताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज औरंगाबादमध्ये ओबीसी समाजाचा (Aurangabad OBC Meet) विभागीय पातळीवर मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे पोस्टर शहरात जागोजागी लावण्यात आले होते. मात्र काही अज्ञातांनी शहरातील सहा ते सात पोस्टर फाडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी (BJP Leaders) प्रचंड संताप व्यक्त केला आहे. द्वेष भावनेतून बॅनर […]

औरंगाबादेत ओबीसी मेळाव्याचे बॅनर फाडले, द्वेष भावनेतून बॅनर फाडल्याचा संशय, भाजपमध्ये संताप
औरंगाबादेत मंगळवारी होणाऱ्या ओबीसी मेळाव्याचे बॅनर फाडलेले दिसून आले.
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 11:36 AM

औरंगाबाद: भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा ताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज औरंगाबादमध्ये ओबीसी समाजाचा (Aurangabad OBC Meet) विभागीय पातळीवर मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे पोस्टर शहरात जागोजागी लावण्यात आले होते. मात्र काही अज्ञातांनी शहरातील सहा ते सात पोस्टर फाडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी (BJP Leaders) प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

द्वेष भावनेतून बॅनर फाडल्याचा संशय

भाजपच्या या मेळाव्याचे बॅनर अज्ञातांनी नक्कीच द्वेषभावनेतून फाडले असल्याची शंका भाजप नेत्यांनी उपस्थित केली आहे. दरम्यान आज मंगळवारी दुपारी बारा वाजता पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शहरात होणाऱ्या मेळाव्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी जागरण अभियान अंतर्गत मराठवाडा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

श्रीहरि पॅव्हेलियन येथे मेळाव्याचे आयोजन

शहानुरमियाँ दर्गा परिसरातील श्रीहरी पॅव्हेलियन दुपारी बारा वाजता हा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास मराठवाड्यातून ओबीसी समाजाचे पदाधिकारी समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात आरक्षण वाचवण्यात राज्य सरकार कशाप्रकारे अपयशी ठरले. याच्यावर चर्चा करण्यात येणार आहे. यासह सर्व पातळ्यांवर सरकार कशाप्रकारे अपयशी ठरत आहे याचीही चर्चा केली जाणार आहे.

पंकजा मुंडेंची विशेष उपस्थिती

मेळाव्यात भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची विशेष उपस्थिती असले. तसेच केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, भाजपा ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी आं. संजय कुटे, ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, माजी मंत्री रामजी शिंदे, माजी विनाधनसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, भाजप प्रदेश सरचिटणीस अतुल सावे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रदेश चिटणीस प्रवीण घुगे, भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस भगवान बापू घडामोडे, शहर जिल्हा अध्यक्ष संजय केणेकर, भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विजय औताडे, भाजप प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर हे उपस्थित राहतील.

ओबीसी समाजात जागृती करण्याचा उद्देश

ओबीसी आरक्षणाबाबत सरकार अपयशी ठरले असून समाजात याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे, हे जनतेला पटून देण्यासाठी औरंगाबादमध्ये भाजप तर्फे विभागीय पातळीवर ओबीसी मेळावा घेतला जात आहे. या मेळाव्यातून ओबीसी आरक्षणात सरकार कसे अपयशी ठरले यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.राज्य सरकारने एम्पिरिकल डाटा सादर केला नाही. यासह भाजप ओबीसी मोर्चाविषयी आवाज उठवल्यानंतर आयोग स्थापन केला. मात्र आयोगाला आता सरकार कामच करू देत ना

इतर बातम्या- 

भाजपनेच ओबीसी, मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा मांडला; जयंत पाटलांचा आरोप

विजय वडेट्टीवार पुन्हा आक्रमक; लवकरच मुंबई, औरंगाबादमध्ये ओबीसींचा भव्य मोर्चा

'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार.
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल.
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?.
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्...
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्....
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले.
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल.
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?.
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली.
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा.