तुळजापूर: मंदिरात प्रशासनाचे नियम डावलल्याने भाजप नेत्यावर गुन्हा, उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

औरंगाबाद: अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी (Tulja Bhavani Temple) मातेचे मंदिर गुरुवारपासून भाविकांसाठी खुले झाले आहे. गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेनंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिर परिसरात कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळणे भाविकांसाठी बंधन कारक आहेत. नवरात्रीच्या काळात मंदिरात कोणत्याही प्रकारची पूजा-विधी करता येणार नाही, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र हा नियम मोडत […]

तुळजापूर: मंदिरात प्रशासनाचे नियम डावलल्याने भाजप नेत्यावर गुन्हा, उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
तुळजापूर मंदिरात नियम डावलून पूजा केल्याने भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 12:32 PM

औरंगाबाद: अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी (Tulja Bhavani Temple) मातेचे मंदिर गुरुवारपासून भाविकांसाठी खुले झाले आहे. गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेनंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिर परिसरात कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळणे भाविकांसाठी बंधन कारक आहेत. नवरात्रीच्या काळात मंदिरात कोणत्याही प्रकारची पूजा-विधी करता येणार नाही, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र हा नियम मोडत मंदिरात तब्बल अर्धा तास पूजा विधी केल्याने उस्मनाबादेतील भाजपच्या नेत्याविरोधात (BJP Leader) गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी (Osmanabad District Collector) दिले आहेत.

भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांवर कारवाई

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडल्यानंतर गुरुवारी दुपारी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी थेट मंदिरात जाऊन सहकुटुंब दर्शन घेतले. तसेच कुलाचार पूजा, विधी करण्यावर बंधन असताना त्यांनी अर्धा तास पूजा केली. हा प्रकार समोर येताच जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी नियम डावलून मंदिरात घुसणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, असे आदेश स्थानिक अधिकाऱ्यांना दिले. तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपासून भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला होता. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात हजारो भाविकांनी महाद्वारासमोरून शिखर दर्शन घेतले. पोलिसांचा कडक पहारा मंदिराभोवती असताना राज्यातील मंदिरे भाजपच्या आंदोलनामुळेच भाविकांसाठी खुली करण्यात आल्याचे सांगत मंदिरे खुली झाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी आचार्य भोसले यांनी नियम डावलून गुरुवारी दुपारी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासोबत मंदिराचे विश्वस्त आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विशाल रोचकरी, अविनाश गंगणे आदी उपस्थित होते. मात्र, भाविकांसाठी मंदिरात प्रवेश बंद असताना राजकीय पुढाऱ्यांसाठी नियम डावलून थेट गाभाऱ्यातून दर्शनाचा लाभ देण्यात आल्याने भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सर्वांसाठी नियम सारखेच!

नियम सर्वांना सारखेच असून कोणी नियमाचा भंग केला असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कायद्याचा आदर सर्वांनी केला पाहिजे, असे अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

दुपारी 12 वाजता मंदिरात घटस्थापना

कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास गुरुवारी प्रारंभ झाला. दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. तत्पूर्वी घटकलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मंचकी निद्रा संपवून कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिरात घटकलशाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून गोमुख तीर्थापासून मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 6 वाजेपासून भाविकांना प्रवेश सुरू झाला.

असा असणार नऊ दिवसांचा कार्यक्रम

  • 9 ऑक्टोबर रोजी रथअलंकार महापूजा
  • 10 ऑक्टोबर रोजी ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा
  • 11 ऑक्टोंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा
  • 12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा
  • 13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा
  • 14 ऑक्टोबर रोजी घटोत्थापन

15 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे. त्यांनतर 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागीरी पोर्णिमेनंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल अशी माहिती महंत तुकोजी बुवा यांनी दिली.

इतर बातम्या-

Tuljabhavani Mata | तुळजाभवानी मातेच्या मंदिरात छबिना मिरवणूक, पहिल्या माळेची सांगता

Navratri 2021 : नवरात्रीच्या उपवासादरम्यान चुकूनही करु नका या चुका, वजन कमी नाही तर वाढेल!

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.