औरंगाबादः शहरातील सिडको परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे (Balasaheb Thackeray Memorial) काम सुरू आहे. या स्मारकाच्या संरक्षक भिंतीसाठीच्या खोदकामात सव्वाशे वर्षांपूर्वीची नाणी आढळून आली आहेत. तब्बल दोन किलो वजनाची ही नाणी ब्रिटिशकालीन (British Coins) असून त्यावर व्हिक्टोरिया राणीचा (Victoria Queen) मुकूट व मुद्रा आहेत. औरंगाबाद महापालिका प्रशासनाने पुरातत्त्व विभागाकडे (Archaeological department) ही नाणी सुपूर्द केली आहेत.
खोदकाम सुरु असताना एका कापडी पिशवीत ही नाणी सापडली. पिशवीत आणखी एका जीर्ण झालेल्या पिशवीत ही नाणी होती. त्यामुळे नाण्यांचा मातीशी काहीही संपर्क झाला आणि कोणतीही रासायनिक प्रक्रिया झाली नाही. सुरुवातीला ही नाणी तांब्याची असावीत अशी शंका आली. हे पडताळून पाहण्यासाठी ज्वेलर्सना बोलावण्यात आले. तपासणीत नाण्यांना अत्यंत उच्च प्रतीचा सोन्याचा मुलामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटिश काळातील सोन्याचा मुलामा इतका घट्ट होता की, खूप घासल्यानंतरही नाण्याचा रंग फिका पडत नसे.
ही नाणी सव्वाशे वर्षांपूर्वीची असून त्यावर व्हिक्टोरिया राणीचा मुकूट व मुद्रा आहेत. एकूण दोन किलो वजनाच्या या नाण्यांवर 1881 चा स्पष्ट उल्लेख आढळतो.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संरक्षण भिंतीचे काम रत्नगुरू एजन्सीसला मिळालेले आहे. पाठीमागील बाजूस जेसीबीने खड्डे खोदून त्यातील माती बाहेर काढत असताना सोमवारी संध्याकाळी अचानक नाण्यांचा खणखणाट झाला. पाहणी केली असता एका गाठोड्यात नाणी सापडली. काही नाणी खड्ड्यातही आढळून आली. कंत्राटदार रोहीत स्वामी यांनी वॉर्ड अभियंता व्ही. के. गोरे यांना ही माहिती दिली. त्यानंतर महापालिका आणि पुरातत्त्व विभागातर्फे ही नाणी नेमकी कोणत्या काळातील आहेत, कशाची आहेत, यासंबंधी तपास केला.
इतर बातम्या-