Aurangabad: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बिझनेस प्लॅन स्पर्धा, अंतिम विजेत्याला सिलिकॉन व्हॅलीच्या स्पर्धेची तिकिटं!

| Updated on: Jan 12, 2022 | 7:00 AM

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा निकाल आल्यानंतर यातील विजेत्याला टाय पुणेच्या जागतिक स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. विजेत्याला सिलिकॉन व्हॅलीला पाठवले जाईल व तिथे ते जागतिक टाय चॅप्टरमधील विजेत्यांशी स्पर्धा करतील.

Aurangabad: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बिझनेस प्लॅन स्पर्धा, अंतिम विजेत्याला सिलिकॉन व्हॅलीच्या स्पर्धेची तिकिटं!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकण्याच्या वयातच उद्योजकतेला चालना मिळावी या उद्देशाने मराठवाड्यासह  बिझनेस प्लॅन (Business plan) स्पर्धेचे आयोजन करण्यात आला आहे. मराठवाडा अ‍ॅक्सलरेटर फॉर ग्रोथ अँड इनक्युबेशन कौन्सिल (मॅजिक) च्या सहकार्याने पुण्यातील टीआयई अर्थात Technology, Innovation and Entrepreneurship University तर्फे बिझ को टायन्ट अर्थात बिझनेस प्लॅन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यासह पुण्याजवळील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.

स्थानिक पातळीनंतर जागतिक स्तरावर संधी

राज्यातील 10 विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी टाय संस्था, पुणे आणि मॅजिक संस्थेसोबत करार केला आहे. स्पर्धेत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची आधी महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा आयोजित केली जाईल. त्यानंतर इंट्रा कॉलेज स्पर्धा घेतली जाईल. इंट्रा कॉलेज स्पर्धेनंतर टाय पुणे चॅप्टर स्तरावर आंतर महाविद्यालयीन स्पर्धा घेतली जाईल. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा निकाल आल्यानंतर यातील विजेत्याला टाय पुणेच्या जागतिक स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. विजेत्याला सिलिकॉन व्हॅलीला पाठवले जाईल व तिथे ते जागतिक टाय चॅप्टरमधील विजेत्यांशी स्पर्धा करतील.

आकर्षक बक्षीसांची संधी

पुण्यातील  अंतिम आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतील विजेत्यांना एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळेल. तसेच जागतिक स्पर्धेतील विजेते स्पर्धक एक लाख डॉलरचे बक्षीस जिंकतील. सिलिकॉन व्हॅलीमध्ये पोहोचलेल्या सर्व विद्यार्थअयांना बूट कँपमध्ये सहभागी होता येईल.

स्पर्धेत जास्तीत जास्त नवयुवकांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘मॅजिक’तर्फे करण्यात आले आहे.

रजिस्ट्रेशन कुठे करणार?

सध्या महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने पुढील लिंकवर रजिस्ट्रेशन करता येईल. स्पर्धेची सर्व माहिती या लिंकवर मिळेल. जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपल्या नव संकल्पना सादर कराव्यात, असे आवाहन मॅजिकचे संचालक आशिष गर्दे यांनी केले आहे. स्पर्धेसाठीची लिंक – https://www.tiepune.org/biz-quotient/

इतर बातम्या-

नाव किली पॉल. काम, नुसती Instagramवर हवा करायची भाव! आता ‘Saami Saami’वर ठेका धरलाय राव

Nashik bus| सिटीलिंकच्या बस रस्त्यावर पार्क, चालकांची अरेरावी, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा