ये बात है.. मंगळसूत्र हिसकावण्यासाठी चोराने गालात चापट मारली, पण त्याला काय माहित आपण कोणत्या महिलेशी पंगा घेतलाय..

ज्या महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न चोराने केला, ती महिलाही डॅशिंग निघाली. तिच्या धाडसामुळे त्याचा हा प्रयत्न सपशेल फसला.

ये बात है.. मंगळसूत्र हिसकावण्यासाठी चोराने गालात चापट मारली, पण त्याला काय माहित आपण कोणत्या महिलेशी पंगा घेतलाय..
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 1:03 PM

औरंगाबादः मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकवासाठी बाहेर निघालेल्या महिलांचे दागिने पळवणारे चोर सक्रिय झाले आहेत. वाळूज एमआयडीसी परिसरात मकर संक्रांतीच्या दिवशी चार मंगळसूत्र चोरी झाल्याच्या घटना घडल्या. दुसऱ्या दिवशी शनिवारीदेखील एसटी कॉलनीत मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न झाला. पण ज्या महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न चोराने केला, ती महिलाही डॅशिंग निघाली. तिच्या धाडसामुळे त्याचा हा प्रयत्न सपशेल फसला.

काय घडलं नेमकं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाजनगर येथील पुष्पा विजय निकम या अंगणात रात्री 10.30 वाजता मोबाइलवर बोलत होत्या. एक चोर धावत त्यांच्या दिशेने आला. अचानक पुष्पा यांच्या गालात चापट मारली. नंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करताच पुष्पा यांनी हिंमतीने चोरट्याचा शर्ट घट्ट पकडला. चोर-चोर असा आरडाओरडा सुरु केला. त्यांचा आवाज ऐकून नागरिक मदतीला धावले. जमलेल्या लोकांनी चोराला चांगलाच चोप दिला.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भारत राजू गडवे, असे या चोरट्याचे नाव असून नागरिकांनी त्याला धू धू धूतला आणि पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सदर महिलेचे परिसरात कौतुक होत आहे. महिलांनी थोडी हिंमत दाखवली तर अशा प्रकारच्या घटना करण्याची चोरांची हिंमत होणार नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

इतर बातम्या-

Video : ढील दे दे रे बंदर भैया… पतंगबाजीत माकडही नव्हतं मागे, संक्रांतीदिवशी छतावर चढत दिला शानदार परफॉर्मन्स

रोहित शर्मा होणार टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार, मात्र BCCI ची हिटमॅनसमोर महत्त्वाची अट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.