VIDEO: दानवेंनी रुग्णालयात बसून पैसे वाटले, माझा पराभव झाला; चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं. (chandrakant khaire slams raosaheb danve over lok sabha election defeat)

VIDEO: दानवेंनी रुग्णालयात बसून पैसे वाटले, माझा पराभव झाला; चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट
चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 1:12 PM

औरंगाबाद: शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं. त्यामुळेच माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (chandrakant khaire slams raosaheb danve over lok sabha election defeat)

चंद्रकांत खैरे यांनी मीडियासी संवाद साधताना हा आरोप केला आहे. यावेळी खैरे यांनी भाजप नेत्यांवर आगपाखडही केली. लोकसभा निवडणुकीच्या काळात रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयात बसून पैसे वाटप केले. त्यामुळे माझा पराभव झाला. जावयाला पुढे करून दानवेंनी माझा पराभव केला. आता तोच जावई दानवेंना शिव्या घालत आहे, असा हल्लाही खैरे यांनी चढवला.

कराडांना मीच नगरसेवक केल, मी मोठा नेता

यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही टीका केली. कराड यांना मीच नगरसेवक केलं. मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

औरंगाबादची जागा शिवसेनेचीच

शिवसेनेला काटशह देण्यासाठी कराड यांना मंत्रिपद देण्यात आलं असेल तर चांगलं आहे. बरं आहे ना उलटं. ते दिल्याने आमच्याही लक्षात येतं. आमचे कार्यकर्तेही खडबडून जागे होतात आणि कामाला लागतात. त्यांना लोकसभेचं तिकिट दिलं तरी काहीच हरकत नाही. शिवसेनेची ही जागा आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. युतीतही शिवसेनेची जागा होती. महाविकास आघाडीतही शिवसेनेचीच जागा आहे, असं ते म्हणाले. (chandrakant khaire slams raosaheb danve over lok sabha election defeat)

कराडच मला भेटायला येतील

मी दिल्लीत गेलो होतो. पण कराडांना भेटलो नाही. माझ्याकडे वेळ नव्हता. ते येतील मला भेटायला. ते मला नेताच मानतात. मी त्यांना खूप सीनियर आहे, असं ते म्हणाले. मला ज्यांनी पाडलं त्या दानवेंना मी का शुभेच्छा द्याव्यात? असा सवालही त्यांनी केला. दानवेंनी भाजपचे 15 आमदार माझ्याविरोधात कामाला लावले. दानवेंमुळे अर्धा भाजप माझ्याविरोधात काम करत होता. त्यांचं काय अभिनंदन करायचं, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या 5 बड्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई, अकाऊंट ‘लॉक’, काँग्रेस नेते म्हणतात, ‘आम्ही लढत राहू!’

जातीवाचक शिविगाळ, विवाहबाह्य संबंधाच्या आरोपानंतर मनसे काय करणार? गजानन काळेंवर कारवाई होणार?

शरद पवार म्हणाले, माझ्या 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी कधीही असं पाहिलं नव्हतं, नेमकं काय घडलंय?

(chandrakant khaire slams raosaheb danve over lok sabha election defeat)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.