देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या अन् गाव जेवण घ्या; चंद्रकांतदादांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर
सांगली महापालिकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा शॉक द्या, तुम्हाला सोन्याचा मुकुट घालेन, अशी ऑफर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. (chandrakant patil new offer to bjp party workers in Deglur-Biloli assembly by-election)
नांदेड: सांगली महापालिकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा शॉक द्या, तुम्हाला सोन्याचा मुकुट घालेन, अशी ऑफर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना ऑफर दिली आहे. देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफरच चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.
देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री ही अनोखी ऑफर दिलीय. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे पाटील यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे या गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केलं. पाटील यांच्या गाव जेवणाच्या ऑफरमुळे ते चांगलेच चर्चेत येण्याची शक्यता आहे. तसेच सध्या देगलूर-बिलोली विधानसभेत पाटील यांच्या ऑफरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
कराड, दानवे, शेलारही प्रचारात
देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेस पाठोपाठ भाजपने कंबर कसलीय. भाजपने या निवडणुकीत आतापर्यंत रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, भागवत कराड आणि आशिष शेलार या प्रमुख नेत्यांना प्रचारात उतरवलंय. भागवत कराड यांनी देगलूर पोट निवडणुकीसाठी गावोगावी प्रचार सभा घेतल्या आहेत. खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या प्रचारसभामुळे देगलूरमध्ये आता रंगत येत आहे.
तुम्हाला सोन्याचा मुकुट घालेन
दरम्यान, सांगलीतही त्यांनी अशीच एक ऑफर दिली होती. सांगली महापालिकेत ‘कार्यक्रम’ करणाऱ्या नेत्यांना तुम्ही दोन छोटे शॉक दिले आहेत. एकदा एक ‘मोठा शॉक’द्या. तुमचा सोन्याचा मुकुट घालून सत्कार करतो, असं सांगत पाटील यांनी महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी नवे ‘टार्गेट’ दिले होते.
महापालिकेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण समिती सभापती निवडीत भाजपने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना यांच्या संभाव्य कार्यक्रमाला दाद न देता आपले वर्चस्व ठेवले. याबद्दल जयंत पाटील यांचे नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करीत नवे ‘टार्गेट’ दिले. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी, कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. यावेळी त्यांनी महापौर- उपमहापौर निवडणुकीत भाजप सोडून गेलेल्यांना परतण्याचे आवाहनही केले.
महापालिका आणि इस्लामपूर नगरपरिषदेत सत्तांतर घडवून भाजपने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना धक्के दिले आहेत. नुकतेच महापालिकेच्या सभापती निवडीतही राष्ट्रवादीचे मनसुबे धुळीस मिळवले आहेत. हा धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांना पराभूत करून धक्का देण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे.
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 20 October 2021https://t.co/HRVDKF8hda#MahafastNews100 #mahafast100newsbulletin #MaharashtraNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2021
संबंधित बातम्या:
तरुणाला धबधब्यात बुडताना पाहून मित्रांचा पोबारा, घरी वेगळाच बनाव, अखेर तीन दिवसांनी बिंग फुटलं
(chandrakant patil new offer to bjp party workers in Deglur-Biloli assembly by-election)