सर्वात मोठी बातमी ! पंकजा मुंडे यांची बदनामी करण्यामागे भाजपचाच एक गट; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कबुलीने खळबळ

निवडणूक आयोगाकडे प्रकरण सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोग एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करत असेल तर आयोग निर्णय करेल आणि तो निर्णय मान्य केला पाहिजे.

सर्वात मोठी बातमी ! पंकजा मुंडे यांची बदनामी करण्यामागे भाजपचाच एक गट; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कबुलीने खळबळ
chandrashekhar bawankuleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 1:32 PM

जालना: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. त्यातच त्यांना शिवसेनेकडूनही पक्षात येण्याची ऑफर मिळाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी हा दावा फेटाळून लावला होता. तर काही नेत्यांनी या विषयावर बोलणं टाळलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चांना बळच मिळत होतं. पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबतच्या वावड्या सातत्याने उठत असतात. मात्र, त्यामागे कोण आहे? असा सवाल सर्वांनाच भेडसावत असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनीच त्याबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बीडमधील कार्यक्रमातील स्टेजवरील व्हायरल व्हिडीओवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंकजाताईंना सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला होता. कारण पंकजा मुंडे या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यामुळे या कृतीने त्यांचा अपमान झाला असे समजणे हे हस्यास्पद आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

एक युनिट सक्रिय

तसेच पक्षातीलच काही लोक पंकजा मुंडेंना आणि पक्षाला बदनाम करत आहेत. भाजपमध्ये पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारं एक युनिट आहे. तेच हे काम करत आहे. कोणीतरी हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी कबुलीच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एवढी घाई का आहे?

यावेळी त्यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना चांगलेच फटकारले. निवडणूक आयोगावर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. परंतु आदित्य ठाकरे यांना एवढी घाई का आहे हे मला माहीत नाही? असा सवाल त्यांनी केला.

सत्य काय हे जनतेने बघितले

निवडणूक आयोगाकडे प्रकरण सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोग एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करत असेल तर आयोग निर्णय करेल आणि तो निर्णय मान्य केला पाहिजे. आदित्य ठाकरेंनी एवढी घाई करू नये. सत्याचा विजय होईल. परंतु, सत्य काय आहे हे 12 कोटी जनतेने बघितले आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

तुमच्या रक्तातच बेईमानी

तुमच्या रक्तात बेईमानी आहे. बेईमानी करून तुम्ही राज्य मिळवले होते. त्यामुळे खरे सत्य काय आहे हे निकाल आला की कळेलच. घटनाबाह्य सरकार उद्धव ठाकरे यांनी बनवले होते. भाजपच्या युती सोबत निवडून आले.

एवढीच धमक होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवताना आमदारकीचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जायला हवे होते. निवडून येऊनच सरकार बनवायचे होते, असं आव्हानच त्यांनी दिलं.

जनतेच्या मनातील सरकार

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली म्हणून शिवसेनेचे आमदार निवडून आले. घटनाबाह्य सरकार उद्धव ठाकरे यांनी बनवले. आताचे शिंदे फडवणीस यांचे सरकार नियमाने आलेले सरकार आहे. तसेच हे सरकार जनतेच्या मनातील सरकार आहे, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....