Aurangabad gold: सोने-चांदी स्वस्तच, मुहूर्तही खास, गुंतवणुकीची संधी सोडू नका, वाचा औरंगाबादचे भाव

औरंगाबाद: नकारात्मकतेची मरगळ झटकून उत्सवाचे स्वागत करण्यासाठी म्हणजेच नवरात्रोत्सवासाठी सारेच सज्ज झाले आहेत. विविध ठिकाणच्या बाजारपेठाही आता फुलू लागल्या आहेत. सराफा बाजारातही (Aurangabad sarafa Market) आता पितृपक्ष संपताना चांगलीच वर्दळ दिसू लागली आहे. त्यात विशेष म्हणजे मागील महिन्यापासून सोने आणि चांदीच्या दरातील घटही जैसे थे स्थितीत आहे. त्यामुळे उत्सवाच्या मुहूर्तावर सोने-चांदीत गुंतवणूक (Investment in Gold […]

Aurangabad gold: सोने-चांदी स्वस्तच, मुहूर्तही खास, गुंतवणुकीची संधी सोडू नका, वाचा औरंगाबादचे भाव
नवरात्रीनिमित्त शहरातील बाजारपेठेत विविध चांदीच्या प्रतिमांची आवक झाली आहे.
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 3:26 PM

औरंगाबाद: नकारात्मकतेची मरगळ झटकून उत्सवाचे स्वागत करण्यासाठी म्हणजेच नवरात्रोत्सवासाठी सारेच सज्ज झाले आहेत. विविध ठिकाणच्या बाजारपेठाही आता फुलू लागल्या आहेत. सराफा बाजारातही (Aurangabad sarafa Market) आता पितृपक्ष संपताना चांगलीच वर्दळ दिसू लागली आहे. त्यात विशेष म्हणजे मागील महिन्यापासून सोने आणि चांदीच्या दरातील घटही जैसे थे स्थितीत आहे. त्यामुळे उत्सवाच्या मुहूर्तावर सोने-चांदीत गुंतवणूक (Investment in Gold And Silver) करु इच्छिणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.

औरंगाबादमधील भाव काय?

औरंगाबादच्या सराफा बाजारात आज मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 46,500 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. काल हे दर 46,250 रुपये प्रति तोळा असे होते. तसेच आज एक किलो शुद्ध चांदीचे दर 63,500 रुपये एवढे नोंदले गेले. काल हे दर 200 रुपयांनी कमी म्हणजेच 63,300 रुपये एवढे नोंदले गेले. शेअर  येत्या दोन दिवसात नवरात्रोत्सवाला सुरुवात होतेय. त्यामुळे सराफा बाजारातही ग्राहकांची वर्दळ पहायला मिळतेय.

नवरात्रासाठी चांदीच्या वस्तुंची आवक

नवरात्रोत्सवासाठी औरंगाबादच्या सराफा बाजारात विविध चांदीच्या वस्तुंची आवक सुरु झाली आहे. चांदीचा देवपाट, देवांसाठी चांदीचे मुकूटही बाजारात आले आहेत. तसेच देवी-देवतांच्या चांदीच्या प्रतिमाही सराफा बाजारात पहायला मिळत आहेत. नवरात्रासाठी ग्राहकांकडून यंदा चांदीच्या वस्तूंची जास्त मागणी असल्याची माहिती, औरंगाबादचे सराफा व्यापारी दत्ता सराफ यांनी दिली.

भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

कोरोना संकटामुळे एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था रोडावली असताना परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाल्याने देशाला मोठा झटका बसला होता. सोन्याच्या दरात (Gold Rate) झालेल्या मोठ्या घसरणीमुळे हा परिणाम पाहायला मिळत आहे. 18 जूनला परकीय चलन गंगाजळी 4.148 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरुन 603.933 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली होती.

पाच वर्षात सोनं 90 हजारांवर?

आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या- 

Aurangabad: महापालिका उभारणार सात चार्जिंग स्टेशन अन् ई-कारही खरेदी करणार, नव्या पदाधिकाऱ्यांसाठी पालिकेची तयारी

Aurangabad: शेतीच्या नुकसान भरपाईसाठी तरुणाचं जलसमाधी आंदोलन, औरंगाबादेतल्या सलीम अली सरोवरात उतरला तरुण 

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.