औरंगाबाद शहरातील सिनेमागृहे आज उघडणार, ‘चेहरे’ अन् ‘बेल बॉटम’ प्रेक्षकांच्या भेटीला

हिल्या दिवशी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांचा रहस्यपट ‘चेहरे’ अणि इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या सत्य घटनेवर आधारित अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

औरंगाबाद शहरातील सिनेमागृहे आज उघडणार, 'चेहरे' अन् 'बेल बॉटम' प्रेक्षकांच्या भेटीला
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 12:25 PM

औरंगाबादः कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली शहरातील चित्रपट गृहे (Movie Theater) आज सुरु होत आहेत. त्यामुळे सिनेरसिकांची 19 महिन्यांची प्रतीक्षा संपणार आहे. पहिल्या दिवशी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांचा रहस्यपट ‘चेहरे’ (Chehre) अणि इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या सत्य घटनेवर आधारित अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वच सिनेमागृहांमध्ये काळजी घेतली जात आहे. चित्रपटगृहांमध्ये युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्याची माहीत, चित्रपटगृह मालकांनी सांगितले.

‘तान्हाजी’ नंतर पडदा बंदच

दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटानंतर मोठ्या पडद्याचे दर्शन प्रेक्षकांना घडले नाही. गेल्या वर्षी निम्म्या आसन क्षमतेसह परवानगी मिळाली होती. मात्र, त्यावर व्यवसाय करणे शक्य नसल्याने वितरकांनी नवे चित्रपटच प्रसिद्ध केले नाहीत. त्यामुळे खुली करण्यात आलेली चित्रपटगृहे पुन्हा प्रेक्षकांविना सुनी झाली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय कमी झाला आहे. शिवाय लसीकरण मोहीमदेखील यशस्वी झाली आहे. त्यामुळे चित्रपट व्यावसायिकांत उत्साहाचे वातावरण आहे. असे असले तरीही बिग बजेट बहुचर्चित असलेले सूर्यवंशी, थालायवी आणि 83 हे चित्रपट दिवाळीनंतरच प्रदर्शित केले जाणार आहेत. आता ‘चेहरे’ हा रहस्यपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल, तर इंदिरा गांधी पंतप्रधान असताना झालेल्या विमान अपहरणावर आधारित ‘बेल बॉटम’देखील मनोरंजन करण्यात महत्त्वाचा ठरेल, असे चित्रपटगृह व्यवस्थापक आणि मालकांचे म्हणणे आहे.

रुपेरी पडद्याची सर इतर माध्यमांना नाही

टीव्ही आले तेव्हा सिंगल स्क्रीन, टुरिंग थिएटरला फटका बसला. मग आम्ही मल्टिप्लेक्सकडे शिफ्ट झालो. आता ओटीटी आले तर आम्ही सिनेमासोबत उत्तम कॅन्टीन देणार आहोत. चित्रपट माध्यमात बदल झाला तरी रुपेरी पडद्याची सर कुणालाच येऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया खिवंसर मल्टिप्लेक्सचे व्यवस्थापक पीयूष कोटेचा यांनी दिली.

आगामी काळात दमदार सिनेमे

रोहित शेट्टीचा सूर्यवंशी, रणवीर सिंगचा83 हे सिनेमे दोन वर्षांपासून तयार आहेत. आलियाचा गंगुबाई काठियावाडी, अक्षय कुमारचा बायोपिक, बंटी और बबली, तडप, प्रभासचा राधेश्याम, अटॅक असे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. जानेवारी महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात चित्रपटांची बरसात होणार आहे.

इतर बातम्या-

करण जोहरचा आयकॉनिक चित्रपट पाहून भडकल्या होत्या शबाना आझमी, फोन करून सुनावले खडे बोल!

Marathi Movie | अनलॉकनंतर मनोरंजनाची नांदी, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट ‘जयंती’!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.