Aurangabad | औरंगाबादेत दोन गटांत तुफान हाणामारी, कॅनॉट परिसरात तणावाचे वातावरण
औरंगाबाद शहरातील कायदा व सुव्यस्थेवर प्रश्न निर्माण करणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कॅनॉट परिसरात दोन टोळक्यात तुफान हाणामारी झाली आहे. विशेष म्हणजे या हाणामारीत दोन्ही गटाचे जवळपास वीस ते तीस जण सामील होते.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील कायदा व सुव्यस्थेवर प्रश्न निर्माण करणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कॅनॉट परिसरात दोन टोळक्यात तुफान हाणामारी झाली आहे. विशेष म्हणजे या हाणामारीत दोन्ही गटातील जवळपास वीस ते तीस जण सामील होते. या मारामारीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र या घटनेमुळे कॅनॉट परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे सध्या इथे शांतता आहे.
दोन गटात टोकाची हाणामारी
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहराच्या कॅनॉट परिसरात अचानकपणे दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत तब्बल वीस ते तीस जण सामील होते. या वादाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार या दोन गटांत अत्यंत टोकाची हाणामारी झाली.
औरंगाबादेतील कॅनॉट परिसरात दहशतीचे वातावरण
ही हाणामारी का झाली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मात्र ही हाणामारी भीषण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेतल्यामुळे या हाणामारीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मुंबईत क्लीन-अप मार्शलला मारहाण
दुसरीकडे 18 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये मास्क न लावण्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. अंधेरी पश्चिमेत (Andheri West) क्लीन अप मार्शला (Clean Up Marshal) मारहाण करण्यात आली होती. अंधेरी पश्चिम येथील एस.वी रोडवर गुरुवारी (18 नोव्हेंबर) संध्याकाळी एक महिला रिक्षामध्ये मास्क तोंडाच्या थोडं खाली घालून जात होती. अशातच बीएमसीच्या दोन क्लीन-अप मार्शल्सनी त्या महिलेचे फोटो काढून 200 रुपयाच्या दंडाची पावती फाडली होती.मात्र, यावरुन महिला आणि क्लीन-अप मार्शलमध्ये बाचाबाची सुरु झाली आणि याचे रुपांतर हाणामारीत झाले होते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यात क्लीनअप मार्शल गंभीररित्या जखमी झाले होते. याप्रकरणी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इतर बातम्या :
कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : बिनविरोध निवड झाल्यानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया
भाजपने कोणत्याही परिस्थितीत सरकार पाडायचं ठरवलंय, पण त्यांना यश येणार नाही; भुजबळांचा टोला