वाघाचं नाव ठेवायला गेले अन् चिठ्ठीत ‘ते’ नाव आलं… अजितदादा खोखो हसले, मुख्यमंत्री शिंदे आणि मुनगंटीवार यांनी काय केलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालपासून संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. काल संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय गेण्यात आले आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली.

वाघाचं नाव ठेवायला गेले अन् चिठ्ठीत 'ते' नाव आलं... अजितदादा खोखो हसले, मुख्यमंत्री शिंदे आणि मुनगंटीवार यांनी काय केलं?
Cm Eknath Shinde Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 2:32 PM

संभाजीनगर | 17 सप्टेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचं मंत्रिमंडळ कालपासून संभाजीनगरात आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील जनतेशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमात भाग घेतला. औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातही मुख्यमंत्री आले होते. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवारही होते. वाघाच्या बछड्यांचं नाव ठेवण्यासाठी मुख्यमंत्री या उद्यानात आले होते. यावेळी एक किस्सा घडला. त्यामुळे अनेकांना हसू आवरणे कठिण झाले. तर राजकीय निरीक्षक या किश्यातून राजकीय अर्थ शोधू लागले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार सिद्धार्थ उद्यानात आले होते. तिघेही एकसाथ उभे होते. यावेळी त्यांना वाघांच्या बछड्यांचं नाव ठेवण्यास सांगितलं. त्यासाठी त्यांना काचेचं एक भांडं दिलं. त्यात काही चिठ्ठ्या होत्या. या चिठ्ठ्यांवर नावे होती. त्यातील चिठ्ठी उचलल्यानंतर जे नाव येईल तेच वाघाच्या बछड्यांना द्यायचं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक चिठ्ठी काढली. त्यात श्रावणी हे नाव आलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, श्रावणातली आहे म्हणून तिचं नाव श्रावणी.

अन् चेहरेच पडले

त्यानंतर अजितदादांनी एक चिठ्ठी काढली. त्यात एक नाव आलं आणि अजितदादा खोखो हसले. त्यांनी ही चिठ्ठी सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांना दाखवली. त्यानंतर दादा पुन्हा हसले. यावेळी या दोन्ही नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. कारण अजितदादांनी काढलेल्या चिठ्ठीत आदित्य हे नाव होतं. त्यामुळे मुनगंटीवार यांनी एक नाव निघालं. पण ते मागे घ्या. आदित्य नाव निघालं, असं सुधीरभाऊ म्हणाले. अन् त्यानंतर ती चिठ्ठी बाजूला ठेवून दुसरी चिठ्ठी काढण्यात आली.

त्यांना आदित्यची भीती

आदित्य नाव आल्याने चिठ्ठी बदलण्यात आल्याने आता त्यावरून मराठवाड्यात राजकारण रंगलं आहे. ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावरून शिंदे आणि मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची त्यांना भीती वाटत आहे. त्यांना वाघाचे नाव ठेवायचं होतं. पण चिठ्ठीत पहिलं नाव आदित्य निघालं. त्याची भीती वाटली. त्यामुळे चिट्ठी मागे घेतली. किती दिवस असं करणार. एक ना एक दिवस आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणारच आहे. लवकरच होणार आहेत. म्हणूनच त्यांची भीती यांना वाटते, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.

कोणीच झाकू शकत नाही

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सरकारवर टीका केली आहे. मला वाटतं कोणत्याच आदित्यला, मग पृथ्वीवरील महाराष्ट्राचा असेल किंवा अवकाशातील आदित्य असेल त्याला कुणी थांबवू शकत नाही. झाकू शकत नाही. कुणात हिंमत नाही. या आदित्यची भीती असेल तर चांगलं आहे. मला त्याचा सार्थ अभिमान आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.

शिंदेंची सारवासारव

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या चिठ्ठीबाबतचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सारवासारवीचं उत्तर दिलं. अरे नाय हो. अरे चिठ्ठ्या काढल्या त्यात दोन एकदम निघाल्या, म्हणून मग एक मागे ठेवली, अशी सारवासारव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.