येणारा काळच काय ते ठरवेल, मुख्यमंत्र्यांचं एकामागोमाग एक सूचक विधान, तर्कवितर्कांना जोरदार उधाण
मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यावरू राजकीय धुरळा उडालेला असतानाच मुख्यमंत्र्यांनी आणखी एक विधान केलं आहे. (CM Uddhav Thackeray)
औरंगाबाद: मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यावरू राजकीय धुरळा उडालेला असतानाच मुख्यमंत्र्यांनी आणखी एक विधान केलं आहे. येणारा काळच काय ते ठऱवेल, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी एकामागोमाग एक सूचक विधान केल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (cm uddhav thackeray reaction on shiv sena and bjp alliance)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादमध्ये आहे. विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, भूमिपूजन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी असं विधान तुम्ही केलं. त्यामागचं नेमकं कारण काय? त्याचा काय अर्थ लावायचा? असा सवाल त्यांना पत्रकारांनी केलं. त्यावर त्यांनी पुन्हा सूचक विधान करून चर्चेचा धुरळा उडवून दिला. अर्थ तोच होता, आजी-माजी सहकारी तिथे होते आणि उद्या कोणी एकत्र आले तर भावी होऊ शकतात. सगळे म्हणजे येणारा काळच काय ते ठरवेल, असं सूचक विधान करतानाच गमती जमतीचा भाग सोडा. माझा प्रामाणिक मत आहे, राजकारण आपल्या ठिकाणी, एका पातळीवर हवं. विकृत स्वरुप नको. हल्ली विकृत स्वरुप येत आहे. ते थांबले पाहिजे. राज्यात महाविकास आघाडी, केंद्रात भाजप सरकार. आपण या मातीतील आहोत, आपआपल्या पदांचा महाराष्ट्रासाठी काय उपयोग करता येईल, ते पाहावं यासाठी मी बोललो, अशी सारवासारव मुख्यमंत्र्यांनी केली.
चंद्रकांतदादांना टोला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका असं विधान केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला असं कानावर आलंय की, ते आमच्या तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार आहेत, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.
योजना लवकर पूर्ण व्हाव्या
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या वीरांना अभिवादन केलं. काही योजना जाहीर केल्या. अभ्यास करून घोषणा केल्या, अभ्यासाला वेळ लागत नाही. मनोदय आहे, अडीअडचणी येऊ नयेत, लवकर योजना पूर्ण व्हाव्या, असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनऐवजी मुंबई-नागपूर जोडणं महत्वाचं
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनऐवजी, मुंबई-नागपूर हा भाग जोडला तर चांगलं आहे. ही दोन शहरं बुलेट ट्रेनने जोडली जात असतील तर आमचं सरकार पूर्ण सहकार्य करणार. औरंगाबाद-नगर, पुणे- नाशिक रेल्वेचा प्रकल्प आहे, जे जनतेच्या हिताचे प्रकल्प आहेत, जिथे राज्य सरकारचा वाटा उचलण्याची गरज आहे, तिथे आम्ही कमी पडलेलो नाही, असं सांगतानाच पंचतारांकित MIDC पाहण्याची माझी इच्छा होती. योगायोगाने दोन-चार दिवसापूर्वी नीती आयोगाची बैठक झाली. तिथे आपली स्लाईड दाखवली त्यावेळी आनंद झाला. देशाला आणि राज्याला अभिमान वाटेल अशी MIDC प्रत्यक्षात उभी केली. त्याची जाहिरात व्यवस्थित व्हायला हवी. राज्यात जे उद्योग येऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले. (cm uddhav thackeray reaction on shiv sena and bjp alliance)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 17 September 2021 https://t.co/QOyEpQzxHd #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 17, 2021
संबंधित बातम्या:
पेट्रोल-डिझेल स्वस्त करायला ठाकरे सरकारचा विरोध? अजित पवारांच्या भूमिकेनं विरोधकांना आयतीच संधी?
(cm uddhav thackeray reaction on shiv sena and bjp alliance)