जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे निमित्त साधणार

पैठण येथील संत एकनाथ महाराज संतपीठाचे उद्घाटनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या 17 सप्टेंबर अर्थात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे निमित्त साधणार
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 4:17 PM

औरंगाबाद: जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी (Marathwada Muktisangram) हे भूमिपूजन केले जाईल. जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक सर्व परवानग्या नुकत्याच मिळाल्या आहेत. तसेच आता इमारतीच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे (Nilesh Gatane) यांनी दिली. नव्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला होता. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात या भूमिपूजनासाठी वेळ मिळाल्याचे वृत्त दै. लोकमतने दिले आहे.

मुख्य इमारतीच्या मागील बाजूस उभारणार

जिल्हा परिषदेची नवी इमारत ही मुख्य प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस बांधली जाईल. या इमारतीच्या मागील बाजूस जिल्हा परिषदेची निर्विवादीत पाऊणे तीन एकर जमीन आहे. या जागेवरच परिषदेची नवी इमारत बांधण्याचे नियोजन आहे. या जागेवरील आरोग्य, पंचायत, कृषी, शिक्षण व स्वच्छता विभाग, स्वच्छतागृह, एनएचएम व पाणीपुरवठा विभागाचे स्थलांतर करण्यात आले आहे.

पैठणच्या संतपीठाचीही घोषणा करणार

दरम्यान, पैठण येथील संत एकनाथ महाराज संतपीठाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या 17 सप्टेंबर अर्थात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. एमजीएम विद्यापीठाच्या वर्धापनदिन कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संतपीठात संत साहित्य, तत्त्वज्ञान आणि संगीत विभागाअंतर्गत एकूण पाच अभ्यासक्रमांची सुरुवात केली जाणार आहे. यात तुकाराम गाथा परिचय, ज्ञानेश्वरी परिचय, वारकरी कीर्तन, हरिदास कीर्तन आणि एकनाथी भागवत परिचय प्रमाणपत्र या अभ्यासक्रमांचा समावेश असल्याचेही सांगितले.

सांप्रदायिक कलांचा अभ्यास करण्याचा उद्देश

पैठण येथे हे संतपीठ उभारले जात आहे. भारतीय परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक मूल्ये व संस्कारांची समाजात निर्मिती करणे तसेच सांप्रदायिक कलांचा अभ्यास करणे अशी अनेक उद्दिष्टे या संतपीठामागे आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरु करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ( CM Uddhav Thackeray will do Bhumi Poojan of Aurangabad new ZP building)

इतर बातम्या- 

Aurangabad Alert: मिठाई खरेदी करताना सावधान, ट्रेवर Best Before Date लिहिलंय का पहा

मृत्यूनंतरही हालअपेष्टा थांबेनात ! पुलाच्या दुर्दशेमुळे मृतदेह जेसीबीने आणण्याची वेळ

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.