Weather Alert: राज्यातून थंडी गायब, अवकाळी पावसाच्या सरी, काय आहे ढगाळ वातावराणाचं कारण?

मागील चार दिवसांपासून मराठवाड्यासह महाराष्ट्रात काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले नसून ढगाळ वातावरण आहे. तसेच नांदेड, परभणी, औरंगाबादसह पुणे, पंढरपूर परिसरात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. पुढील चार दिवस ढगाळ वातावरण राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Weather Alert: राज्यातून थंडी गायब, अवकाळी पावसाच्या सरी, काय आहे ढगाळ वातावराणाचं कारण?
पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला पावसाची हजेरी
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 9:53 AM

औरंगबादः रखडलेल्या पावसाळ्यानंतर (Rain in Marathwada) हिवाळ्यात तरी थंडीचं निरोगी वातावरण निर्माण होईल, अशी आशा लागलेल्या मराठवाड्यात हवानामानानं निराशा केली आहे. मागील चार दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पहायला मिळतोय. मराठवाड्यात नांदेड, परभणी, औरंगाबादसह राज्यात पुणे, पंढरपूरमधील (Rain in Pandhrpur ) काही भागात काल पावसाच्या सरी कोसळल्या. अन्य भागात   दिवसभर ढगाळ वातावरण असून मागील चार दिवसांत किमान तापमानाचा पारा 23 अंश सेल्सियसपर्यंत गेला आहे. मागील आठवड्यात, जेव्हा चांगली थंडी पडली होती, त्यावेळी मराठवाड्यातील (Temperature in Marathwada) काही भागात तापमानाचा पारा 10 अंश सेल्सियसपर्यंत घसरला होता.

18 नोव्हेंबरपर्यंत ढग, राज्यात कुठे आहे पावसाचा अंदाज?

हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 18 नोव्हेंबरपर्यंत राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र, संलग्न मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 17 नोव्हेंबरच्या आसपास पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच दक्षिण महाराष्ट्र गोवा किनारी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. पुढील तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहून मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात 15 नोव्हेंबर रोजी पाऊस पडेल. तर 16 नोव्हेंबर रोजी उस्मानाबादमध्ये पाऊस पडेल. 17 नोव्हेंबर रोजी लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, अशी शक्यता मराठवाड्यातील हवामान तज्ञ डॉ. के. के. डाखोरे यांनी व्यक्त केली आहे.

पुणे, पंढरपुरात पाऊस, कार्तिकी यात्रेत भाविकांची तारांबळ

महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी काल हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेनिमित्त जमलेल्या भाविकांनाही पावसामुळे अडचण निर्माण झाली. पंढरपूरसह आसपासच्या तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. मराठवाड्यातही नांदेड, परभणी, लातूर, बीडसह औरंगाबादमधील शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर दिसून आला.

आणखी किती दिवस ढगाळ, थंडी कधी पडणार?

नोव्हेंबर महिन्यात एखाद्या वेळी ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. सद्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच ईशान्येकडीला मान्यूसन सक्रिय असल्याने मराठवाड्याती काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. यामुळे तापमानात वाढ होत असल्याचे चित्र आहे. पुढील तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानात जास्त घट होणार नाही. मात्र जसजसे ढगाळ वातावरण स्वच्छ होईल, उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढेल, त्यानंतर थंडीचा जोर हळू हळू वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली.

इतर बातम्या-

Babasaheb Purandare | इतिहासाची खडानखडा माहिती असणारे बाबासाहेब पुरंदरे नेमके कोण?

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल… कार्तिक एकादशी निमित्त विठुरायाला फुलांची आकर्षक आरास

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.